5 November 2024 8:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

मोदींचे ट्विटर फॉलोअर्स ६ कोटींच्या पुढे, २०१८ मध्ये ६० टक्के फॉलोअर्स फेक होते

Twitter, Modi Followers, Fake Followers

नवी दिल्ली, १९ जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2009 मध्ये मायक्रो ब्लागिंग साइट ट्विटरवर अकाउंट ओपन केले होते. ते ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या नेत्यांच्या यादीत आहेत. आता त्यांच्या ट्विटर अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्या तब्बल 60 मिलिअनच्या पुढे गेली आहे. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतासह संपूर्ण जगात 6 कोटींहून अधिक लोक ट्विटरवर फॉलो करतात. तर मोदी स्वतः 2,354 लोकांना फॉलो करतात.

तत्पूर्वी, २०१८ मध्ये ट्विटरने त्यांच्या एकूण अकाउंट्सच ऑडिट प्रसिद्ध केलं होतं. त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ६० टक्के फॉलोअर्स हे फेक फॉलोअर्स असल्याचे समोर आले होते. ट्विटरने अधिकृतपणे केलेल्या या ऑडिट’मध्ये फेक फॉलोअर्सचा छडा लावण्यात आला होता. त्यानुसार जगातील प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये नरेंद्र मोदींचे नाव येत असलं तरी त्यांच्या फेक फॉलोअर्सचा आकडा सर्वानाच धक्कादायक होता. त्यावेळी मोदींच्या एकूण ४ कोटी फॉलोअर्स पैकी ६० टक्के म्हणजे चक्क २ कोटी ४० लाख मोदी फॉलोअर्स हे फेक अकाउंट्स म्हणजे फेक फॉलोअर्स असल्याचं स्वतः ट्विटरने म्हटलं होतं.

त्याआधी टाईम्स मॅगझीनच्या यादीत झळकलेले नरेंद्र मोदी ट्विटरने अधिकृतपणे जाहीर केलेल्या यादीमुळे मोदी हे जगात खरंच प्रसिद्ध आहेत का या बद्दल देशभरात संभ्रम निर्माण झाला होता. त्यावेळी फेक फॉलोअर्सच्या यादीत मोदींच्या पाठोपाठ पोप फ्रान्सिस यांचं नाव होतं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चौथ्या स्थानी होते, त्यांच्या फेक फॉलोअर्सची टक्केवारी ही ३७ टक्के इतकी म्हणजे नरेंद्र मोदींच्या एकूण फेक फॉलोअर्सच्या जवळजवळ निम्मी होती.

 

News English Summary: The number of followers on Modi’s Twitter account has crossed 60 million. This means that Prime Minister Narendra Modi has more than 6 crore followers on Twitter all over the world, including India. Modi himself follows 2,354 people.

News English Title: The number of followers on Modi Twitter account has crossed 60 million News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x