23 February 2025 8:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

पश्चिम बंगाल | मोदींचा फोटो नव्हे, आता लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर ममतांचा फोटो दिसणार

CM Mamata Banerjee

कोलकत्ता, ०४ जून | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत लसीकरण सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो पाहायला मिळायचे, मात्र आता लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात बंगालच्या 18 ते 44 वयोगटातील लोकांच्या लसीकरण प्रमाणपत्रात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फोटो ठेवले जात आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्र सरकारच्या लस धोरणावर सातत्यानं प्रश्न उपस्थित करत असतात. तसेच सर्व लोकांना मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. यासंदर्भात सीएम ममता बॅनर्जी यांनी मुख्य मंदिरातील पुजार्‍यांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिलेत. आता तिसर्‍या टप्प्यात बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फोटो बसविण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पश्चिम बंगाल सरकार लोकांना मोफत लस देत आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, प्रत्येक लसीसाठी 600 ते 1200 रुपये खर्च केले जातात. 1.4 कोटी लोकांना लसी देण्यात आल्यात. वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत तुम्ही पाहिले तर बंगालमध्ये 8 कोटी लोक आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांची लसीची मागणी पूर्ण करावी. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विविध औद्योगिक कक्षांना राज्य सरकारच्या आपत्ती विभागाला निधी द्यावा, अशी विनंती केली होती, राज्य सरकार त्यांना ही लस देईल.

 

News English Summary: The conflict between West Bengal Chief Minister Mamata Banerjee and Prime Minister Narendra Modi is not going to stop. Until now, photos of Prime Minister Narendra Modi used to be seen on vaccination certificates, but now in the third phase of the vaccination program, West Bengal Chief Minister Mamata Banerjee’s photos are being included in the vaccination certificates of people between the ages of 18 and 44.

News English Title: The photos of Prime Minister Narendra Modi used to be seen on vaccination certificates in West Bengal News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x