26 December 2024 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा
x

केंद्राचा भीषण निर्णय | व्हेंटिलेटर्स उत्पादक कंपनी म्हणतेय 'आम्ही व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनातील तज्ज्ञ नाही'

India corona pandemic

राजकोट, २० मे | देशात कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढीला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत नऊ हजारांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात 2 लाख 76 हजार 70 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबळींचा आकडा घटल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानावा लागेल. कारण एका दिवसात 3 हजार 874 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. हा आकडा आदल्या दिवशी नोंदवलेल्या एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींच्या विक्रमापेक्षा जवळपास 650 ने कमी आहे.

दरम्यान देशात व्हेंटीलेटर्स अभावी अनेकपण प्राण गमावत असताना अनेक धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत. आणि त्यांचा संबंध आहे थेट पीएम केअरशी हेच सिद्ध होतंय. “आम्ही व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनातील तज्ज्ञ नाही, मात्र देशातील सध्याची मागणी लक्षात घेता आम्ही हे व्हेंटिलेटर्स डिझाइन आणि उत्पादित केले आहेत. “मेक इन इंडिया मिशन’ डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे व्हेंटिलेटर्स उत्पादित केले आहेत,’ हे शब्द आहेत राजकोटच्या ज्योती सीएमसी कंपनीच्या वेबसाइटवरील. पीएम केअर फंडासाठी अवघ्या १० दिवसांत ही व्हेंटिलेटर्स तयार केल्याचा ज्योती सीएमसी कंपनीचा दावा आहे. या फंडातून सर्वाधिक व्हेंटिलेटर्सची मागणी मिळालेल्या बंगळुरूच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीनेही “आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत अवघ्या ४ महिन्यांत ३० हजार व्हेंटिलेटर्सची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही कंपन्या भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमधील असून त्यांच्याकडून २ हजार कोटींचे व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यात आले आहेत.

राजकोटच्या ज्योती सीएमसी कंपनीच्या वेबसाइटवरील धक्कादायक मजकूर तुम्ही येथे वाचू शकता: https://jyotihealthcare.com/

कोरोनाच्या पहिल्या लाटेत अतिगंभीर रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर्सची कमतरता भासू लागल्यावर पीएम केअर फंडातून ६० हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली होती. त्यातून महाराष्ट्रात दाखल झालेली व्हेंटिलेटर्सचा पीएसआर – प्रेशर सपोर्ट व्हेंटिलेटर – ४५ वरून २१ वर ड्रॉप होत असल्याने ते कोविड रुग्णालयातील अतिगंभीर रुग्णांसाठी वापरता येत नसल्याचे स्थानिक प्रसार माध्यमांच्या राज्याव्यापी पडताळणीतून सिद्ध झाले.

व्हेंटिलेटर्स पुरवणाऱ्या कंपन्या:

  • ज्योती सीआमसी : गुजरातमधील राजकोट येथील कंपनी. कंपनीचे मालक मुख्यमंत्र्यांच्या जवळचे. कंपनीतर्फे गुजरात सरकारला १००० व्हेंटिलेटर्सची देणगी.
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड : कर्नाटक सरकारची ही कंपनी. “पीएम’ फंडातील सर्वाधिक ३०,००० व्हेंटिलेटरची ऑर्डर. या उत्पादनातून १५०० कोटींचा नफा.
  • एग्वा हेल्थ केअर : हरियाणातील नॉयडा येथील कंपनी. १० लाखांचे व्हेंटिलेटर्स १.५ लाखात तयार केल्याचा दावा. गेल्या वर्षी जेजे हॉस्पिटल आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटलने चालत नसल्याने ८१ व्हेंटिलेटर्स परत पाठवले.
  • एएमटीझेड : आंध्र प्रदेश मेडिटेक झोन या सरकारी प्रकल्पातील ही कंपनी. व्हेंटिलेटर्स निर्मितीचा अनुभव, मात्र ट्रीव्हीट्रॉन या सबकंपनीला उपठेका. ठेका मिळाल्यानंतर ट्रीव्हीट्रॉनने डिझाइन व उत्पादन केल्याचा खुलासा.

काही जिल्ह्यांत कनेक्टर नाही, तर काही ठिकाणी कंपनीकडून दुरुस्तीबाबत प्रतिसाद न मिळाल्याने ते पडून आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी गेल्या वर्षी याच व्हेंटिलेटर्सबाबत भाजपची सत्ता असलेल्या गुजरातमध्येही बोंब उठली होती.

 

News English Summary: We are not an expert in the production of ventilators, but we have designed and manufactured these ventilators considering the current demand in the country. “We have manufactured these ventilators with the Make in India mission in mind,” are the words on the website of Jyoti CMC Company in Rajkot.

News English Title: The Rajkot ventilators supplier company says We are not experts in producing ventilators on website news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x