23 December 2024 12:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

शाळेने फी भरण्यासाठी सतावलं | दहावीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

school demanded fees, Tenth standard student, committed suicide, Indore

इंदौर, १ सप्टेंबर : लॉकडाऊनमध्ये सर्व शाळा बंद आहेत. देशात सर्वत्र सध्या ऑनलाईन अभ्यास सुरु असून विद्यार्थ्यांच्या साधन सामुग्रीचाच वापर करून शिक्षण सुरु आहे. शाळांना देखील कोणत्याही ऑनलाईन पेड प्लॅटफॉर्मचा खर्च उरलेला नाही. त्यात अनेक शाळांनी तर फी घेऊन देखील पुस्तकांचं वितरण केलेलं नाही. देशात सर्वत्र सध्या आर्थिक चणचण सुरु असून सर्वच घरं त्यात भरडली गेली आहेत. त्यामुळे पालकांना देखील शाळेच्या फी भरण्यात अडचणी येत आहेत.

मात्र शाळा पालकांच्या कोणत्याही अडचणी समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. परिणामी शाळा पालकांना फीसाठी प्रचंड त्रास देत आहेत. शाळा प्रशासनाच्या याच त्रासाला कंटाळून दहावीतील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, इंदौरच्या ग्रीन फेल्ड शाळेतील विद्यार्थी हरेंद्र सिंह गुर्जर याने शाळेच्या मुख्याध्यापकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

लसूडिया पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ग्रीन फेल्ड शाळेतील विद्यार्थी हरेंद्र सिंह गुर्जर याने शाळेच्या मुख्याध्यापकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. मृत हरेंद्रसिंह आपल्या भावोजींसोबत महालक्ष्मी नगर येथे राहात होता. शाळेच्या मुख्याध्यापकांनी फीसाठी दररोज तगादा लावला होता. तसेच, फी न भरल्यास दाखला नेण्याची धमकी दिली होती. शाळेच्या या दबावामुळे आणि दररोजच्या धमकीमुळेच हरेंद्रसिंहने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या भावोजींनी सांगितले.

 

News English Summary: Lasudia police rushed to the spot and started investigation. According to police, Harendra Singh Gurjar, a student at Greenfield School, committed suicide after being harassed by the school principal. The deceased Harendra Singh was living with his brothers-in-law at Mahalakshmi Nagar.

News English Title: The school demanded fees a Tenth standard student committed suicide in Indore News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x