24 December 2024 11:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर, आता घरातही मास्क लावण्याची वेळ आली आहे - केंद्र सरकार

India corona pandemic

नवी दिल्ली, २६ एप्रिल: देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले.

देशात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. केंद्र सरकारने तर कोरोनाची ही दुसरी लाट अत्यंत भयंकर असून आता घरातही मास्क लावण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं स्पष्ट होत आहे.

केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून देशवासियांना सावध केलं आहे. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. त्यामुळे आता घरातही मास्क लावण्याची वेळ आली आहे, असं केंद्राने म्हटलं आहे. तसेच महिलांनी मासिक पाळीत लस घेऊ नये, त्यामुळे रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. अशा आशयाचे मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरही केंद्राने स्पष्टीकरण दिलं आहे. मासिक पाळीतही महिला इंजेक्शन घेऊ शकतात. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, असं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्याला ऑक्सिजन आणि कोरोना संबंधित औषधं लागणारच असल्याने आधीच त्यासाठी पाठपुरावा आणि साठवण केल्याचे प्रकार देखील समोर येतं आहेत. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांना ऑक्सिजन कसा काय लागू लागला आहे असं देखील प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. याच विषयाला नुसरून एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी प्रसार माध्यमांना संबोधित करताना त्यांनी आवर्जून म्हटलं आहे की, “कृपया घाबरू नका आणि ऑक्सिजन तसेच कोरोना संबंधित औषधे जमा करून ठेवू नका, अशी कळकळीची विनंती केली आहे.

 

News English Summary: Corona infection has increased tremendously in the country. The central government has said that the second wave of corona is very terrible and now it is time to wear a mask at home. Therefore, it is becoming clear that the situation of corona in the country has got out of hand.

News English Title: The second wave of corona is very terrible and now it is time to wear a mask at home said union govt news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x