23 February 2025 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

कोरोनाच्या प्रसाराची गती इतकी अधिक आहे की ही लढाई थोडी कठीण आहे - अमित शाह

Amit Shah

नवी दिल्ली, १८ एप्रिल: भारत देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे सक्रीय रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात चोवीस तासांत देशात 2.33 लाख नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा अडीच पटीने जास्त असल्याचे वर्तवले जात आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये एका दिवसात सर्वात जास्त 97 हजार प्रकरणे समोर आले होते. शास्त्रज्ञ आणि तज्ञांमध्ये या गोष्टीची चर्चा सुरु असून देशात कोरोनाचे सक्रीय रुग्ण का वाढत आहे यावर विचारमंथन सुरु आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते, देशातील रुग्ण वाढीस जगात आलेला नवीन व्हॅरिएंट आणि भारतातील डबल म्यूटेशन व्हायरस जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशात परिस्थिती चिंताजनक होतं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली आहे. यावेळी मुलाखतीदरम्यान अमित शाह यांना गेल्या वर्षीप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय आहे का? असा सवाल करण्यात आला. त्यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की आता परिस्थिती निराळी आहे. तरीही आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहोत. जो काही एकमतानं निर्णय होईल त्यानुसार आम्ही पुढे जाऊ. परंतु सध्या घाईनं लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती दिसत नाही,” असं अमित शाह उत्तर देताना म्हणाले.

निवडणुकांच्या रॅली आणि कोरोनाची नवी लाट याबाबतही अमित शाह यांना प्रश्न विचारण्यात आला. “पाहा, महाराष्ट्रात निवडणुका आहेक का? त्या ठिकाणी ६० हजार रुग्णांची नोंद होत आहे. या ठिकाणी ४ हजार आहे. महाराष्ट्रासाठीही मला सहानुभूती आहे आणि पश्चिम बंगालसाठीही. याला निवडणुकांसोबत जोडणं योग्य नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या नाहीत त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे. आता तुम्ही काय सांगाल?,” असं अमित शाह उत्तर देताना म्हणाले.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी बरेच उपक्रम सुरू झाले होते. आणीबाणीच्या गोष्टी आता का नाहीत असा सवालही अमित शाह यांना करण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “हे खरे नाही. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत दोन बैठका झाल्या आणि त्यावेळी मीही हजर होतो. नुकतीच सर्व राज्याच्या राज्यपालांसोबतही बैठक पार पडली. सर्व सरकारांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील भागधारकांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी आमची बैठक झाली आहे.” लसीकरणाबाबत आमची वैज्ञानिकांशी चर्चा झाली आहे आणि प्रोटोकॉलमध्ये सुधारणा करण्यासाठीही एक बैठक झाली आहे. यासोबत लढण्याची पूर्ण तयारी केली जात आहे. यावेळी कोरोनाच्या प्रसाराची गती इतकी अधिक आहे की ही लढाई थोडी कठीण आहे. परंतु यावर आपण नक्की विजय मिळवू असा विश्वास असल्याचं शाह म्हणाले.

 

News English Summary: During the interview, Amit Shah asked if lockdown is an option to control the corona outbreak like last year. That was the question. Speaking at the time, Amit Shah said that now the situation is different. Still, we are in discussions with the Chief Minister of the state.

News English Title: The situation is different in second corona wave said union home minister Amit Shah news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#AmitShah(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x