25 December 2024 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

कोरोना युद्धाच्या काळात डॉक्टरांच्या तक्रारींवर तोडगा काढा - सर्वोच्च न्यायालय

Supreme Court of India, Doctors, Corona Worriers

नवी दिल्ली, १३ जून : युद्धाच्या काळात आपण सैनिकांना नाराज करू नका. थोडे पुढे पाऊल टाकून डॉक्टरांच्या तक्रारींवर तोडगा काढा आणि त्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करा, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने सरकारला यावर उपाय करायला सांगितला. एका डॉक्टरांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. यात असा आरोप केला आहे की, कोरोनाविरुद्धच्या लढाईत पहिल्या रांगेत असलेल्या योद्ध्यांना वेतन दिले जात नाही. वेतनात कपात केली जात आहे. वेतनाला विलंब होत आहे.

न्या. अशोक भूषण, न्या. संजय किशन कौल आणि न्या. एम. आर. शाह यांच्या पीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी केली. डॉक्टरांच्या समस्यांबाबत ही याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, अशा बातम्या येत आहेत की, अनेक क्षेत्रात डॉक्टरांना वेतन दिले जात नाही. आम्ही अशा बातम्या पाहिल्या आहेत की, डॉक्टर संपावर आहेत. दिल्लीत काही डॉक्टरांना तीन महिन्यांपासून वेतन नाही. याकडे लक्ष द्या. यात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज पडू नये.

तत्पूर्वी कोरोना रुग्णांना मिळणारे उपचार आणि मृतदेहांची होणारी हेळसांडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस पाठवली आहे. तसंच चाचण्यांची संख्या कमी होत असल्याचीही दखल घेतली आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण, संजय किशन कौल आणि एम आर शाह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. न्यायालयाने केंद्र सरकारसबोत दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारला नोटीस पाठवली आहे.

कोरोना रुग्णांना मिळणारा उपचाराचा दर्जा आणि करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांची लावण्यात येणारी विल्हेवाट याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्यांना खडसावलं आहे. करोना रुग्णांच्या मृतदेहांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात असल्याचं सर्वोच्च न्यायालायने म्हटलं आहे.

 

News English Summary: Do not offend the soldiers during the war. The apex court asked the government to take a step further and resolve the doctors’ grievances and provide additional funds for the same. A doctor has filed a petition in this regard. It alleges that front line fighters in the battle against Corona are not paid.

News English Title: The Supreme Court of India has asked the government to resolve the doctors complaints News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x