22 January 2025 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

त्यांच्या नेत्याला अटक झाल्याने भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन | पण पत्रकारांचं आंदोलन नाही

The Wire, senior Editor Arfa Khanam sherwani, Arnab Goswami

मुंबई, ६ नोव्हेंबर: अर्णब गोस्वामीला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर एक गोष्ट संपूर्ण देश अनुभवतोय आणि ती म्हणजे अर्नबच्या बाजूने कोणतेही पत्रकार किंवा पत्रकारांच्या संघटना खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिलेल्या नाहीत. तसेच पत्रकारांनी देखील ठाकरे सरकारला धारेवर धरल्याचे पाहायला मिळत नाही. उलट अर्नबची चुकीची पत्रकारिता ज्यामध्ये पत्रकार केव्हाही दिसला नाही, त्याउलट किंचाळत आणि मी सांगेन तेच अंतिम सत्य अशा प्रकारे डिबेटमध्ये चर्चा घडवून गरळ ओकणं हाच त्याचा दिनक्रम असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

काही पत्रकारांनी तर अर्नबची अटक हा पत्रकारितेवरील हल्ला नसून ते त्यांच्या व्यावसायिक कारनाम्यातून समोर आलेलं प्रकरण आहे आणि त्याचा पत्रकार तसेच पत्रकारितेवरील हल्ल्याशी कोणताही संबंध नाही असं म्हटलं आहे. आपल्यासाठी कोणताही पत्रकार आंदोलन करणार नाही हे ठाऊक असल्याने रिपब्लिकनेच भाजपाची मदत घेऊन समर्थनाचं नाटक रचल्याचे चर्चा आता समाज माध्यमांवर रंगली आहे.

दरम्यान, द वायरच्या वरिष्ठ पत्रकार आरफा शेरवानी यांनी भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनाचा एक फोटो ट्विट करत एकप्रकारे प्रश्न उपस्थित केला आहे. यासंदर्भात मोजक्या शब्दात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, ‘भाजप कार्यकर्ते त्यांच्या नेत्याला अटक झाल्याने आंदोलन करत आहेत, जर अर्बन गोस्वामी पत्रकार असेल तर पत्रकारांनी आंदोलन केलं पाहिजे.

 

News English Summary: Arfa Sherwani, a senior journalist with The Wire, tweeted a photo of the Bharatiya Janata Party (BJP) movement, raising questions. “BJP workers are protesting against the arrest of their leader. If Urban Goswami is a journalist, then journalists should protest,” he tweeted.

News English Title: The Wire senior Editor Arfa Khanam sherwani twit over BJP Protest after Arnab Goswami arrest news updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x