5 November 2024 2:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News
x

कृषी कायदे फक्त अंबानी-अदानी यांच्या सारख्या मोठ्या लोकांसाठी आणले आहेत - बच्चू कडू

New farm law, Modi government, minister Bachchu Kadu, Farmers Protest

मुंबई, १२ डिसेंबर: कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी पंजाबच्या सात जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजार गावातून 1,500 हून अधिक वाहनं येणार आहेत. त्यापैकी 1,300 ट्रॅक्टर-ट्रॉली दिल्लीकडे येणार आहे. किसान मजदूर संघर्ष समितीने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब आंदोलकांनी त्यांचा एक नवीन काफिला तयार केला आहे. जो रविवारी दिल्लीच्या सीमेपर्यंत दाखल होणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू आंदोलनास्थळी पोहोचले होते.यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारने हे कायदे फक्त अंबानी-अदानी यांच्यासारख्या मोठ्या लोकांसाठी आणले आहे. यामुळे हे कायदे रद्द करणे सरकारला कठीण होत आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

कालची रात्र पलवल बॉर्डरवर येथे घालवली, जेष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर यांचे मार्गदर्शन लाभले. केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कायद्याची काहीच गरज नाही. सरकारकडून हे कायदे शेतकऱ्यांवर जबरदस्तीने लादले जात आहेत. जर सरकारला हे कायदे लागू करायचे होते, तर त्यांनी पहिले शेतकऱ्यांशी सल्लामसलत करायला हवे होते, असे देखील बच्चू कडू यांनी सांगितलं.

 

News English Summary: Meanwhile, Minister of State for Maharashtra Bachchu Kadu had reached the site of the agitation to support the agitation. Speaking on the occasion, he said that the Modi government has brought these laws only for big people like Ambani-Adani. This is making it difficult for the government to repeal these laws, alleged Bachchu Kadu.

New English Title: There is no need for a new farm law passed by the Modi government said minister Bachchu Kadu News updates.

हॅशटॅग्स

#BacchuKadu(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x