23 December 2024 5:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

पावसाळ्यात कोरोनाचा फैलाव वाढणार का? एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले

corona, rainy season, Randeep Guleria

नवी दिल्ली, २८ जून : उष्ण हवामानात कोरोनाचा विषाणू जिवंत राहत नाही तर आर्द्रता असलेल्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार लगेच होतो, असा दावा विविध तज्ज्ञांनी केला होता. मात्र, एम्स रुग्मालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी या प्रश्नावर अत्यंत समाधानकारक उत्तर दिलं आहे आणि याबाबत इंडिया टुडेने या वृत्त दिलं आहे.

डॉ. गुलेरिया म्हणाले, “पावसाळ्यात कोरोनाच्या संक्रमाणाच्या वेगामध्ये विशेष बदल होणार नाही. त्यामुळे कोरोनाच्या संकाटामुळे घाबरलेल्या लोकांसाठी ही दिलासादायक बाब ठरू शकते.” यापूर्वी आयआयटी मुंबईच्या दोन प्राध्यापकांनी एका अभ्यासातून दावा केला होता की, उष्ण आणि शुष्क वातावरणात करोनाचा वेग कमी होतो तर आर्द्रतेच्या वातावरणात संक्रमणाचा वेग वाढतो.

डॉ. गुलेरिया म्हणाले, “मला वाटत नाही की पावसाळा आल्यानंतर करोनाच्या संक्रमणामध्ये कुठलाही नाट्यमयरित्या बदल दिसून येईल. कारण उन्हाळ्यात लोक म्हणत होते की संक्रमण थांबेल पण असं झालं नाही. पण पावसाळ्यात डॉक्टरांना उपचारपद्धती बदलाव्या लागतील. कारण आता डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढू लागतील. ज्याचे लक्षणं करोनासारखेच असतात.

दरम्यान, कोरोना काळात सोशल डिस्टेंसिंग या शब्दाचा वापर जास्त प्रमाणात केला जात आहे. १९३० मध्ये विलियम एफ वेल्स यांनी या संज्ञेचा शोध लावला. तोंडातून निघणारे लाळेचे ड्रॉपलेट्स एक ते दोन मीटरपर्यंत जाऊ शकतात. ४ जुलैपासून ब्रिटनमध्ये सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. २ मीटरचे सोशल डिस्टेंसिंग आत्तापर्यंत पाळले जात होते. आता २ मीटरवरून १ मीटर करण्यात आले आहे.

WHO ने दिलेल्या माहितीनुसार लोकांनी व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी १ मीटर अंतर ठेवणं गरजेचे आहे. एखादी व्यक्ती शिंकत किंवा खोकत असल्यास त्या व्यक्तीपासून लांब राहायला हवे. कारण त्या व्यक्तीच्या जवळपास असल्यास लाळेतून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समार्फत संक्रमण पसरण्याचा धोका असतो. द लेसेंटमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार १ मीटरचं अंतर ठेवल्यास संक्रमणाचा धोका टळू शकतो. पण २ मीटरचं अंतर ठेवल्यास सुरक्षित ठरू शकतं.

 

News English Summary: In hot climates, the corona virus does not survive, but spreads quickly in humid areas, various experts have claimed. However, the director of AIIMS Rugmalaya, Dr. Randeep Guleria has given a very satisfactory answer to this question

News English Title: There will be no significant change in the rate of transmission of the corona during the rainy season said Randeep Guleria News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x