15 January 2025 3:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

अनेकांचा जीव घेणारी नोटबंदी म्हणजे दहशतवादी हल्लाच: राहुल गांधी

Demonetization, PM Narendra Modi, Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra

नवी दिल्ली: नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेऊन १ हजार आणि ५०० च्या चलनी नोटा बंद केल्या. या निर्णयाला तीन वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे ट्विट केलं आहे. नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, तर अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दुसरीकडे प्रियांका गांधी नोटबंदीवरून मोदी सरकारवर निशाणा साधताना म्हणाल्या की, नोटाबंदी ही देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारी एक ‘आपत्ती’ असल्याचे सिद्ध करत काँग्रेस नेते प्रियंका गांधी वड्रा यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर निशाणा साधला. नोव्हेंबर २०१९ मध्ये नोटाबंदीला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रियंकाने मोदी सरकारवर हल्ला केला.

त्यांनी ट्विट करताना म्हटलं आहे, “नोटाबंदीला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. सरकारने नोटाबंदी सर्व आजारांवरील एक इलाज असल्याच्या सरकारच्या दाव्यावर देखील प्रश्नचिन्हे उपस्थित होतं आहे. नोटबंदी ही एक आपत्ती होती, ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था नष्ट झाली. आता या चुकीच्या निर्णयाची जबाबदारी कोण घेणार? “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेसचे सर्व नेते मंडळींनी देशातील आर्थिक मंदीला नोटाबंदीचा निर्णय जवाबदार असल्याचं यापूर्वीच म्हटलं आहे आणि त्यानंतर आता प्रियांका गांधी यांनी देखील प्रहार केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधींनी नोटबंदी हा प्रमुख मुद्दा केला होता. काही दिवसांपूर्वी डॉ. मनमोहनसिंग म्हणाले की उत्पादन क्षेत्रातील विकास दर ०.६ टक्क्यांनी स्थिर राहतो हे त्रासदायक आहे. त्यामुळे स्पष्टपणे सूचित होतं की भारतीय अर्थव्यवस्था अद्याप नोटाबंदीपासून मुक्त झाली नाही आणि त्यात त्वरीत जीएसटी लागू केला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x