28 January 2025 9:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ, तयार राहा | किती धोकादायक असेल हे सांगू शकत नाही - केंद्र सरकार

India corona pandemic

नवी दिल्ली, ५ मे | देशातील कोरोनाची दुसरी लाट थांबायचं नाव घेत नाहीये. या दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबाबत इशारा दिला आहे. सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाटही येईल. विषाणूचा संसर्ग त्याच्या उच्च स्तरावर आहे. तिसरी लाट कधी येईल आणि किती धोकादायक आहे, हे अद्याप माहिती नाही, परंतु नव्या लाटेसाठी आपण तयार असले पाहिजे. राघवन बुधवारी कोरोनाच्या स्थितीबद्दल पत्रकार परिषदेत बोलत होते.

याच पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, कोरोनाची प्रकरणे दररोज 2.4 टक्क्यांनी वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशात 3,82,315 प्रकरणे नोंदली गेली आहेत. 12 राज्यात एक लाखाहून अधिक, 7 राज्यात 50 हजार ते एक लाख आणि 17 राज्यांत 50 हजारांहून कमी सक्रिय प्रकरणे आहेत. 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा पॉझिटिव्ह स्तर 15% पेक्षा जास्त आहे. हे 10 राज्यात 5 ते 15% आणि तीन राज्यांत 5% पेक्षा कमी आहे.

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, दिल्ली आणि हरियाणामध्ये अधिक मृत्यू होत आहेत. बंगळुरूमध्ये गेल्या एका आठवड्यात जवळपास 1.49 लाख प्रकरणे आढळून आली आहेत. चेन्नईमध्ये ही संख्या 38 हजार होती. काही जिल्ह्यात नवीन प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. यामध्ये कोझिकोड, एर्नाकुलम, गुडगाव यांचा समावेश आहे. 9 राज्यात 18+ लसीकरण सुरू झाले आहे. 18-44 वयोगटातील 6.71 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने 16 कोटीहून अधिक डोस विनामूल्य दिले आहेत.

 

News English Summary: The second wave of corona in the country does not take the name of stopping. Meanwhile, the central government has warned of a third wave of corona. Vijay Raghavan, the government’s chief scientific adviser, said a third wave of corona would follow.

News English Title: Third Wave of corona in India is inevitable says expert in union govt news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x