27 January 2025 10:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

मग ती हजारो निवडणूक 'मतदान यंत्रे' कुठे गेली असावी ?

मुंबई : मतदान यंत्र उत्पादक आणि निवडणूक आयोग यांच्याकडून देण्यात आलेल्या मतदान यंत्रांच्या नेमक्या संख्येबाबत कमालीची तफावत असल्याचे उघड झाले असून, हजारो ‘बेहिशेबी’ निवडणूक मतदान यंत्र गेली तरी कुठे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इतकच नाही तर निवडणूक मतदान यंत्रांची वाहतूकही कोणत्याही प्रकारे सुरक्षित नसल्याचे समोर आले असून, भारतातील निवडणूक प्रक्रियेत मतदान यंत्रांचा वापर खरंच निष्पक्षतेने होतो का यावरच प्रश्न चिन्हं उपस्थित करण्यासाठी माहिती समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी जवळ जवळ वर्षभर या सर्व माहितीचा पाठपुरावा करून, माहितीच्या अधिकारात बरीच धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे जी बरेच प्रश्न निर्माण करणारी आहे. आरटीआयमार्फत मिळालेली माहिती जर खरी असेल तर खरंच भारतातील निवडणूक प्रक्रिया किती निष्पक्ष व विश्वासार्ह पणे पार पडते असेल यावरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांना ‘आरटीआय’ अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार १९८९-९० ते १५ मे २०१७ या कालावधीत भारताच्या निवडणूक आयोगाने ‘बीईएल’कडून एकूण १० लाख ५ हजार ६६२ ‘बीयू-यंत्रे’ आणि ९ लाख २८ जहार ४९ ‘सीयू-यंत्रे’ घेतली होती. याच काळात ‘ईसीआयएल’कडून १ लाख १४ हजार ६४४ ‘बीयू’ आणि ९ लाख ३४ हजार ३१ ‘सीयू-यंत्रे’ घेण्यात आली होती. तर दुसरीकडे केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे सन २०१६-१७ मध्ये १३ लाख ९५ हजार ३०६ ‘बीयू-यंत्रे’ व ९ लाख ३० हजार ‘सीयू-यंत्रे’ खरेदी केली गेल्याची माहिती खुद्द निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.

तर सन २०१० ते २०१७ या काळात ‘बीईएल’ने निवडणूक आयोगाला एक लाख २५ हजार ‘बीयू’ व एक लाख ९० हजार ‘सीयू’ यंत्रे पुरविली. दरम्यान याच काळात एकदा २ लाख २२ हजार ९२५ ‘बीयू-यंत्रे’ आणि २ लाख ११ ८७५ ‘सीयू-यंत्रे’ आणि दुसऱ्यांदा ४ लाख ९७ हजार ३४८ ‘बीयू-यंत्रे’ आणि ३ लाख ७ हजार ३० ‘सीयू-यंत्रे’ पुरविल्याची माहिती ‘ईसीआयएल’ने दिली.

परंतु मनोरंजन रॉय यांच्या माहितीनुसार प्रत्यक्ष पुरवलेली मतदान यंत्रे आणि प्रत्यक्ष मिळालेली मतदान यंत्रे यांच्यात निवडणूक आयोगाने आणि बीईएल’ने व ईसीआयएल’ने दिलेल्या आकडेवारीत कित्तेक हजारांपासून ते काही लाखांपर्यंतची तफावत ठळक पाने दिसते आहे. मग मिळालेल्या माहितीवरून साहजिकच प्रश्न उपस्थित होतो की, ती मोठ्या आकड्यांची तफावत असलेली ‘मतदान यंत्र’ गेली किंव्हा जातात तरी कुठे ? या माहितीवरूनच मतदान यंत्रे ‘घेण्यात’ आणि ‘पुरविण्यात’ मोठं गौडबंगाल असल्याचे प्रत्यक्ष माहितीच्या अधिकारातच समोर येत आहे असं आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन रॉय म्हणाले.

याच मतदान यंत्रांसाठी केलेल्या खर्चामध्ये सुद्धा दोन्ही बाजूंकडून मिळालेल्या माहितीतून सगळं गौडबंगाल असल्याचे समोर येत आहे. उदाहरणार्थ, २००६ – २००७ ते २०१६ – १७ मधील उपलब्ध झालेली आकडेवारी अशी आहे. या काळात प्रत्यक्ष मतदान यंत्रांच्या खरेदीवर एकूण ५३६ कोटी १ लाख ७५ हजार ४८५ रुपये खर्च झाल्याचे निवडणूक आयोग सांगतो. तर दुसरीकडे उत्पादन करणारी सार्वजनिक कंपनी ‘बीईएल’ कडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना म्हणजे ‘बीईएल’ला भारतीय निवडणूक आयोगाकडून एकूण ६५२ कोटी ५६ लाख ४४ हजार एवढी रक्कम मिळाली. मग यातील तफावत तब्बल ११६.५५ कोटी रुपयांची आहे त्यांचं काय समजायचं नक्की ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मनोरंजन रॉय यांच्या आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार ३२ बाय ८ बाय ८ फूट इतक्या आकाराच्या ट्रान्स्पोर्टशन कन्टेनरमध्ये १९९ बीयू-यंत्रे आणि २६१ सीयू-यंत्रे राहू शकतात. तसेच २० बाय ८ बाय ८ फूट आकाराच्या ट्रान्स्पोर्टशन कन्टेनरमध्ये १२४ बीयू-यंत्रे’ आणि १६३ सीयू-यंत्रे राहू शकतात. पण प्रत्येक कन्टेनरमधून ३२० ते ४०० यंत्रे पाठविल्याचे ‘बीईएल’ने सांगितले आहे. मग भारतीय निवडणूक आयोगाकडे जास्त यंत्रे पाठविली गेली का ? आणि तसे असेल तर मग या जादा यंत्रांचे पुढे काय झाले ? याची कोणतीच माहिती उपलब्ध नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x