योगी सरकारचा भोंगळ कारभार | कोरोना लस ऐवजी प्राणी चावल्यावर देण्यात येणारी रेबिजची लस दिली
लखनऊ, १० एप्रिल: कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस मिळवण्याच्या धडपडीत लसीचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओशानंतर आता बिहार, उत्तर प्रदेशातही लसीचा तुटवडा हाेऊ लागला आहे. या राज्यांत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. अनेक राज्यांत एक ते दाेन दिवसांचाच साठा शिल्लक आहे. परंतु राज्यांना पाठवण्यात येणाऱ्या लसीमध्ये राजकारण हाेत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळून लावला आहे. काेलकात्यामध्ये एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले, लसीची काेणतीही कमतरता नाही. सर्व राज्यांच्या गरजेनुसार लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसरीकडे काही राज्यांमधील भोंगळ कारभार देखील समोर आला आहे.
योगी सरकारच्या उत्तर प्रदेशात कोरोनाच्या लसीकरणाचा सावळा गोंधळ समोर आलाय. तीन महिलांना कोरोनाची लस द्यायच्या बदल्यात प्राण्यांनी चावल्यावर देण्यात येणारी रेबिजची लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पूर्व उत्तर प्रदेशातील शामली या ठिकाणी घडली आहे.
तीन प्रौढ महिला कोरोनाच्या लसीकरणासाठी केंद्रावर गेल्या होत्या. मात्र त्या ठिकाणी त्यांना कोरोनाची लस न देता रेबिजची लस देण्यात आली. आता या घटनेची चौकशी जिल्हा मॅजिस्ट्रेट करणार असून या प्रकरणी त्यांनी एका फार्मासिस्टला निलंबित केलं आहे. तसेच शुक्रावारी कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या वैद्यकीय अधीक्षकांना या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. संबंधित तीन पैकी एका महिलेला ही लस घेतल्यानंतर जास्तच त्रास जाणवू लागला. ती जेव्हा स्थानिक डॉक्टरांकडे गेली आणि तिला देण्यात आलेल्या लसीची पावती दाखवली त्यावेळी संबंधित महिलेला रेबिजची लस देण्यात आल्याचं स्पष्ट झालं.
News English Summary: The Yogi government’s Uttar Pradesh has come under the shadow of corona vaccination. A shocking case has come to light in which three women were vaccinated against rabies after being bitten by an animal instead of being vaccinated against corona. The incident took place at Shamli in eastern Uttar Pradesh.
News English Title: Three women given rabies vaccine instead of Covid19 in Utter Pradesh news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम