काही काम न करता नुसती बडबड करणारे चॅम्पियन परतले, अमित शहांना टोला
कलकत्ता, ९ जून: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. केंद्र सरकारच्या योजना पश्चिम बंगालमध्ये लागू केल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अमित शाह यांच्या टीकेला तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी उत्तर दिलं असून पश्चिम बंगालला गरज होती तेव्हा कुठे होतात अशी विचारणा केली आहे. फक्त बोलणारे आणि काही काम न करणारे चॅम्पियन असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी काहीही काम न करणारे आणि फक्त बोलणारे चॅम्पियन असं म्हणत अमित शहांवर निशाणा साधला आहे. अच्छे दिनवरूनही टीका केली आहे. ‘फक्त बोलणारे आणि काही काम न करणारे चॅम्पियन परतले आहेत. आम्हाला अम्फान वादळ आणि कोरोनाशी लढण्यासाठी केंद्राची मदत हवी होती तेव्हा तुम्ही कुठे होतात?’ असं ट्विट नुसरत जहाँ मंगळवारी (९ जून) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे.
२०१४ मध्ये अच्छे दिनचं आश्वासन देण्यात आलं होतं. यानंतर नोटाबंदी, वाढती महागाई, बेरोजगारी, एनआरसी, सीएए, बेजबाबदारीने हाताळलेली कोरोना परिस्थिती, स्थलांतरील मजुरांकडे केलेलं दुर्लक्ष या गोष्टी समोर आल्या आहेत. बंगालमधील लोक तुमच्या जाळ्यात अडकायला काही आंधळे नाहीत’ असं ही आणखी एक ट्विट नुसरत जहाँ यांनी केलं आहे. अमित शहा यांनी पश्चिम बंगाल सरकारवर केंद्राच्या योजना लागू न करण्याचा आरोप करत आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान देत हा राजकारणाचा मुद्दा नाही. त्यासाठी इतरही मैदानं आहेत. आपण मैनात तयार करा, दोन-दोन हात होऊन जातील असं म्हटलं आहे.
News English Summary: Trinamool Congress MP Nusrat Jahan has responded to Amit Shah’s criticism by asking where West Bengal is when it is needed. This time, they have also put up a team of champions who only talk and do nothing.
News English Title: TMC MP Nusrat Jahan On Central Home Minister Amit Shah Over West Bengal News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या