28 January 2025 12:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

देशात २४ तासांत ४,४५४ रुग्णांचा मृत्यू | वॉशिंग्टन विद्यापीठाचं संशोधन सत्य ठरण्याच्या दिशेने

India corona pandemic

नवी दिल्ली, २४ मे |  देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर रुग्णसंख्येचा विस्फोटच बघायला मिळाला. एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्येचा दुर्दैवी जागतिक विक्रमही भारताच्या नावावर नोंदवला गेला. मात्र, आता हळूहळू रुग्णसंख्येचा आलेख घसरताना दिसत आहे. तर कोरोनामुक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असं असलं तरी करोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे देशावरील चिंतेचं ढग अद्याप कायम आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवार दिवसभरातील करोना आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत दोन लाख २२ हजार ३१५ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आकडेवारी घसरत असल्याचं यातून दिसून येत असून, त्यात आणखी एक दिलासा म्हणजे याच कालावधी देशात तीन लाख २ हजार ५४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत चार हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. चार हजार ४५४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाख तीन हजार ७२० इतकी झाली आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे, पण मृतांचा आकडा थांबायचे नाव घेत नाहीये. मे महिन्यात दररोज सरासरी 3,500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा जगात सर्वाधिक आहे. जगात फक्त दोन देशात कोरोनामुळे तीन लाकांपेक्षा जास्त मृत्यू झाले होते. अमेरिका पहिला आणि ब्राझील दुसरा. अमेरिकेत 6 लाख आणि ब्राझीलमध्ये 4.48 लाख मृत्यू झाले आहेत. या यादीत आता तिसऱ्या नंबरवर भारताचे नाव आहे.

एक लाख मृत्यू फक्त एका महिन्यात झाले:
देशात कोरोनामुळे पहिले एक लाख मृत्यू होण्यासाठी सहा महिने लागले होते. एक लाखांवरुन दोन लाख होण्यास 7 महीने लागले. पण, 2 ते 3 लाख होण्यास फक्त एक महिना लागला.

देशात दररोज साडेपाच हजार मृत्यू होतील अशी भीती वजा इशारा अमेरिकेतील इन्स्टिट्यूटने काही दिवसांपूर्वी दिला होता. हा इशारा खरा ठरतोय की, काय अशी शंका गेल्या २४ तासांतील आकडेवारीवरून डोकं वर काढताना दिसत आहे. देशात कोरोनाचं थैमान सुरू असून, कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगानं वाढत चालला आहे.

 

News English Summary: After the outbreak of the second wave of corona in the country, the number of patients exploded. India also set the unfortunate world record for the highest number of patients in a single day. However, now the graph of patient numbers is slowly declining. So the number of corona free is increasing day by day. Even so, the cloud of concern over the country is still lingering due to the increasing deaths of corona patients.

News English Title: Today India set the unfortunate world record for the highest number of patients in a single day news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x