22 December 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
x

काँग्रेसच्याच पुण्याईवर देश चालतोय, मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज - संजय राऊत

MP Sanjay Raut

मुंबई, ३० मे | केंद्रातील मोदी सरकारला आज सात वर्ष पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मोदी सरकारच्या आजरवच्या कामगिरीबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी मोदी सरकारला आत्मचिंतानाची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. मोदी सरकारच्या आजवरच्या कामगिरीबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी मोदी सरकारला आत्मचिंतानाची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. देश काँग्रेसच्याच पुण्याईवर तरला आहे असं सांगताना राऊत यांनी मोदी सरकारला आणखी मेहनत घ्यायची गरज असल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

काँग्रेसचं सरकार असताना झालेल्या कामामुळेच देशाचा कारभार सुरु आहे असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कामगिरीवर टीका केली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी देशासाठी अजून बरंच काही करणं बाकी असल्याचं म्हटलं आहे. तसंच नवीन काही झालेलं नाही, पण आपण अपेक्षा करु शकतो असंही म्हटलं आहे.

सरकारला लोक बहुमताने निवडून देतात. याचा अर्थ लोकांचा सरकारवर विश्वास आहे. मात्र, देशात आजही महागाई आहे. बेरोजगारी आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली अराजकता आहे. लोकांच्या मागण्या कमी असतात. सर्वांना अदानी, अंबानी बनायचे नसते. त्यांना रोजगार हवा असतो. उत्तम आरोग्य आणि शिक्षण हवे असते. गेल्या सात वर्षात आपण जनतेला हे देऊ शकलो का? याचं मोदी सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला. मोदींकडे नेतृत्व क्षमता आहे. ते देशाला योग्य दिशा देतील, जनतेला योग्य मार्ग दाखवतील याची आजही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मोदींना अजून बरंच काही करणं बाकी आहे, असंही ते म्हणाले.

 

News English Summary: Today marks the seventh anniversary of the Modi government at the Center. Against this backdrop, Shiv Sena MP Sanjay Raut, when asked about the performance of the Modi government, has said that the Modi government needs self-reflection.

News English Title: Today marks the seventh anniversary of the Modi government at the Center MP Sanjay Raut slams BJP news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x