15 January 2025 11:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

जम्मू-काश्मीर: दोन दहशतवाद्यांना अटक; कारमध्ये अतिरेक्यांसोबत पोलीस उपअधिक्षक सुद्धा सापडला

Jammu Kashmir, Hizbul Terrorists in Kashmir

जम्मू: जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांसह जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्याच पोलीस उपअधिक्षकाला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या या पोलीस उपअधिक्षकाला राष्ट्रपती पदक पुरस्कारानेही गौरवण्यात आलेलं आहे. देविंदर सिंह असं या पोलीस अधिक्षकाचं नाव असून ते एअरपोर्ट सिक्युरीटीसाठी तैनात होते, अशी प्राथमिक माहिती आहे. दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडण्यासाठी देविंदर सिंह मदत करत होते, असा त्यांच्यावर आरोप आहे.

देविंदर सिंह असं या पोलीस अधिक्षकाचं नाव असून ते एअरपोर्ट सिक्युरीटीसाठी तैनात होते. त्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासोबतच्या दोन अतिरेक्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. सैय्यद नवीद मुश्ताक उर्फ नवीद बाबू असं एका अतिरेक्याचं नाव असून दहशतवादी संघटनांमध्ये अतिरेकी रियाज नाइकूनंतर त्याचा नंबर लागत असल्याचं सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितलं. दुसऱ्या अतिरेक्याचं नाव आसिफ राथर असं आहे. पोलिसांनी या तिघांनाही कुलगाम जिल्ह्यातील काजीगुंडच्या मीर बाजार परिसरात अटक केली.

पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंह यांना गेल्यावर्षी १५ ऑगस्टला राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते. ते जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्या अँटी हायजॅकिंग स्क्वॉडमध्ये सामील होते. सध्या त्यांची ड्युटी श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर होती. याआधी २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतर देविंदर सिंह यांचे नाव चर्चेत आले होते. त्यावेळी ते पोलीस निरीक्षक असताना स्पेशल ऑपरेशन ग्रुपमध्ये सामील होते. अँटी टेरर ऑपरेशननंतर त्यांचे प्रमोशन झाले. त्यानंतर त्यांची पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

 

Web Title:  Top Jammu Kashmir Police officer caught with 2 Hizbul Terrorists in Kashmir.

हॅशटॅग्स

#Kashmir(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x