16 April 2025 7:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
x

जगाने इंग्लंड विमान सेवा खूप आधीच रोखली | आपले प. बंगालच्या राजकारणात मग्न | तोपर्यंत भारतात..

five passengers, London to Delhi, Corona positive

नवी दिल्ली, २२ डिसेंबर: लंडनहून दिल्लीला आलेल्या प्रवासी विमानातील ५ प्रवासी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. एकूण २६६ प्रवासी या विमानामध्ये होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील ५ प्रवाशांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आता भारताची चिंता वाढली आहे. कारण, युरोपमध्ये सध्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने हाहा:कार माजवला आहे. त्यामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा चतुर्थ श्रेणीचा कडक लॉकडाउन जाहीर केला आहे.

जगभरात एक आठवडा आधीच ब्रिटनच्या विमान सेवेवर बंदी घातली होती. भारतात मोदी सरकार गाफील राहिलं आणि प. बंगालच्या राजकरणात मग्न झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातही अनेक राज्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर ट्विट करून भारत सरकारला ब्रिटनच्या विमानसेवेवर तात्काळ बंदी घालण्याची विनंती केली. त्यानंतर काल दिल्लीत धावाधाव झाली आणि उशिरा निर्णय जाहीर करण्यात आला. परिणामी दिल्लीत एकूण २६६ प्रवाशांना घेऊन लंडनहून एक विमान भारतात आलं आहे, ज्यामध्ये तब्बल ५ प्रवासी हे कोरोना पॉझिटिव्ह निघालेआहेत. त्यामुळे मोदी सरकार किती गाफील आहे याचा अंदाज येऊ शकतो.

दरम्यान, ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळल्याने इतर सर्व देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. वेगाने पसरणारा करोनाचा हा नवा प्रकार चिंता वाढवत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) महत्वाची माहिती देण्यात आली आहे. करोनाचा नवा प्रकार अद्यापही अनियंत्रित झालेला नसून योग्य उपाययोजना करत तो रोखला जाऊ शकतो असं आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. एएफपीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

 

News English Summary: New strain in news since a week. When all countries stopped flights 7 days ago, what were you waiting for? Again Modi govt delayed decision making.

News English Title: Total five passengers came from London to Delhi got corona positive news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या