15 November 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

लता मंगशेकर, सचिन तेंडुलकर, सायनाच्या ट्विटची चौकशी होणार | गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Anil Deshmukh, celebrities Tweets, Rihanna Tweet, Farmers Protest

मुंबई, ०८ फेब्रुवारी: पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश देण्यात आल्याचं अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केलं. त्यामुळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल, अक्षयकुमार, अजय देवगन, विराट कोहली आदींच्या ट्विटची चौकशी होणार आहे.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटीजच्या ट्विटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचं कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, असं सचिन सावंत यांनी सांगितलं.

देशपातळीवर मोठा प्रचंड दबाव संविधानिक संस्था तसंच विरोधी सरकारांवर आहे. जो कोणी विरोध करेल त्यांच्यावर दबाव आणला जातो. त्याच पार्श्वभूमीवर यांच्यावरही दबाव आणलेला असू शकतो. दबावात राहता कामा नये आणि बोलायचं असेल तर निर्भीडपणे बोलावं ही महाविकास आघाडी सरकारची जबाबदारी आहे.

मोदी सरकार हे करत असेल आणि ते हे करण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही चौकशीची मागणी केली होती. त्याचं गांभीर्य ओळखून गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत,” अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली आहे.

 

News English Summary: Many celebrities had tweeted after pop singer Rihanna supported the farmers’ movement in Delhi. Anil Deshmukh clarified today that an inquiry will be held as the tweets of all the celebrities show similarities. Therefore, the tweets of Empress Lata Mangeshkar, Sachin Tendulkar, Saina Nehwal, Akshay Kumar, Ajay Devgn, Virat Kohli and others will be investigated.

News English Title: Tweets of Indian celebrities will be investigated said Home minister Anil Deshmukh news updates.

हॅशटॅग्स

#AnilDeshmukh(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x