22 December 2024 6:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

भारत-चीन वादावर केंद्र सरकारची भूमिका काय? - सोनिया गांधी

India China, ladakh, Sonia Gandhi, PM Narendra Modi

नवी दिल्ली, १७ जून : जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लडाखमधील हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. यावेळी त्यांनी चर्चा सुरू करण्यापूर्वी सर्व मुख्यमंत्र्यांसह शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

चीन आणि भारतीय सैन्य दलात झालेल्या संघर्षावर यावेळी पंतप्रधानांनी थोडक्यात भाष्य केलं. ‘भारताने कधीच कोणावर आक्रमण केलं नाही. तसंच भारत जशाचं तसं उत्तर देण्यास सक्षम असून जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं मोदी म्हणाले. दरम्यान, पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. तर चीनचे ३५ जवान मारले गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पूर्व लडाखमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे भारताच्या पंतप्रधानांनी आता पुढे येऊन जनतेला संबोधित केलं पाहिजे. चीनने देशाचा भाग हडपला कसा यावर बोललं पाहिजे, आपेल २० सैन्य शहीद का झाले, तिकडची सध्याची परिस्थिती काय आहे? असे विविध प्रश्न आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मांडले आहेत.

आपले आणखी काही सैन्य बेपत्ता आहेत का? आणखी किती सैन्य आणि अधिकाऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे?नक्की कोणता भाग चीनने व्यापला आहे? या सर्व प्रकरणावर सरकारचे नियोजन कसे आहे? असे सवाल सोनिया गांधी यांनी उपस्थित केले आहेत. शिवाय, सैन्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी काँग्रेस उभी असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

 

News English Summary: Twenty Indian soldiers have been martyred in East Ladakh. Therefore, the Prime Minister of India should now come forward and address the people. We have to talk about how China grabbed part of the country, why were 20 soldiers martyred, what is the current situation there? Such various questions have been raised today by the interim president of the Congress, Sonia Gandhi.

News English Title: Twenty Indian soldiers have been martyred in East Ladakh Sonia gandhi asked question to PM Narendra Modi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SoniaGandhi(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x