1 January 2025 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | नोकरी असो किंवा व्यवसाय महिन्याला पेन्शन हवी असेल तर, 'हा' मार्ग ठरेल फायद्याचा NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉकला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड सहित डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, 33% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबद्दल खुशखबर आली, मल्टिबॅगर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: SUZLON
x

BREAKING | योगींच्या मर्जीतील आणि युपीच्या माजी मुख्य सचिवांची निवडणूक आयुक्त पदी वर्णी | केंद्राचा निर्णय

Uttar Pradesh Assembly Election 2022

नवी दिल्ली, ०९ जून | केंद्र सरकारने मंगळवारी उत्तर प्रदेशच्या 1984 बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी अनुप चंद्र पांडे यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. याबाबत अधिकृत लेखी घोषणा देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणेज अनुप चंद्र पांडे हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या मर्जीतले अधिकारी म्हणून सर्वश्रुत आहेत.

माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी १२ एप्रिल रोजी सेवानिवृत्ती घेतलेल्या त्यांच्या जागी अनुप चंद्र पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आता तीन सदस्यीय कमिशन आता पूर्ण क्षमतेचं करण्यात आलं आहे. आगामी उत्तर प्रदेश, पंजाबमधील महत्त्वपूर्ण विधानसभा निवडणुका देखील त्यांच्या देखरेखीखाली होतील आणि त्यानंतर गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड निवडणुका असं चित्र जवळपासस्पष्ट झालं आहे.

उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. तत्पूर्वी योगींच्या विश्वातील अधिकारी मुख्य निवडणूक पदी नेमल्याने मोठी चर्चा रंगली आहे. तसेच २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भाजपसाठी उत्तर प्रदेश अत्यंत महत्वाचा आहे, पण कोरोनाच्या महाभयानक स्थितीने यूपीतील वातावरण मोदी आणि भाजप विरोधी झाल्याने संघ तसेच भाजप सतर्क झाल्याचं म्हटलं जातंय.

 

News English Summary: The Union government on Tuesday appointed Anup Chandra Pandey, a retired IAS officer of the 1984 batch, Uttar Pradesh cadre, as Election Commissioner. Pandey has been appointed to the position left vacant by former Chief Election Commissioner Sunil Arora’s retirement on April 12.

News English Title: Union Govt has appointed retired Uttar Pradesh cadre IAS officer Anup Chandra Pandey as Election Commissioner news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x