17 April 2025 4:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

हिंसक शेतकरी आंदोलन | अमित शाह यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक

Union home minister Amit Shah, farmers tractor rally

नवी दिल्ली, २६ जानेवारी: नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे. आयटीओ येथे शेतकऱ्यांनी पोलिसांची व्हॅन, क्रेन ताब्यात घेतली आहे. त्यामुळे पोलीस या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करत आहे. शेतकरी आंदोलन अधिकच चिघळल्याने दिल्लीतील मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. शेतकरी लाल किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवल्याने संपूर्ण दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीत गृहसचिव आणि दिल्लीचे पोलीस आयुक्तदेखील उपस्थित आहेत. दरम्यान, या बैठकीनंतर कायदा सुव्यवस्थेसाठी मजबूत व्यवस्था करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

तत्पूर्वी हिंसाचारामुळे दिल्ली-एनसीआरमधील अनेक भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सिंघू सीमा, गाझीपूर, टिकरी, मुकरबा चौक, नांगलोई या भागातील इंटरनेट सेवा रात्री १२ वाजेपर्यंत बंद करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलीय.

 

News English Summary: The Home Secretary and Delhi Police Commissioner are also present at the meeting, which is being held at Union Home Minister Amit Shah’s residence. Meanwhile, strong arrangements for law and order are expected to be made after the meeting. Meanwhile, Union Home Minister Amit Shah is taking stock of the situation at the meeting. ANI has given the news in this regard quoting sources.

News English Title: Union home minister Amit Shah called urgent meeting over farmers tractor rally news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या