आम्ही त्यांना एनडीएतून बाहेर काढले नाही | शिवसेना - अकाली दलच एनडीएमधून बाहेर पडले
नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर : “राज्यपालांना आपल्या पत्रात काही वेगळे शब्द वापरता आले असते. काही शब्द टाळता आले असते”, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील धार्मिक स्थळे, मंदिर खुली करण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले होते. या पत्रात राज्यपालांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वावर बोट ठेवले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांना पत्रातून सडेतोड प्रत्युत्तर दिले. गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधील हाच पत्रव्यवहार राजकीय वर्तुळात गाजतो आहे.
नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांनी महाराष्ट्रातील परिस्थिती आणि राज्यपाल-मुख्यमंत्री पत्रव्यवहार यावर भाष्य केले आहे. “तुम्हाला सेक्युलर शब्दाचा तिरस्कार होता. मग आता तुम्ही अचानक सेक्युलर झालात का?”, असा बोचरा सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता. त्यावर, “राज्यपालांना त्यांच्या पत्रात काही शब्द टाळता आले असते, दुसरे शब्द वापरता आले असते”, असे अमित शहा यावेळी म्हणाले.
दरम्यान शिवसेना, अकाली दलानं भाजपची साथ सोडली. शिवसेना गेल्या वर्षी भाजपची साथ सोडली. तर अकाली दलानं कृषी विधेयकांच्या मुद्द्यावरून एनडीएला सोडचिठ्ठी दिली. शिवसेना आणि अकाली दल भाजपचे जुने मित्र पक्ष होते. त्यांनी भाजपशी फारकत घेतल्यानं भाजपप्रणित एनडीएला धक्का बसला. त्यावर अमित शहांनी ‘नेटवर्क१८’ ला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. ‘एनडीएमध्ये आजही ३० पेक्षा जास्त पक्ष आहेत. शिवसेना आणि अकाली दलानं भाजपची साथ सोडली. आम्ही त्यांची साथ सोडली नाही,’ असं शहा म्हणाले.
शिवसेना, अकाली दलासोबत पुन्हा हातमिळवणी करणार का, त्यांच्यासाठी एनडीएचे दरवाजे खुले आहेत का, असे प्रश्न शहांना विचारण्यात आले. त्यावर ‘मी काही ज्योतिषी नाही. पण सध्या तरी ते (अकाली दल) कृषी विधेयकांवर अडून राहिले आहेत. शिवसेना आणि अकाली दलाला आम्ही एनडीएतून बाहेरचा रस्ता दाखवलेला नाही. ते स्वत:च एनडीएमधून बाहेर पडले. त्याला आम्ही काय करू शकतो?,’ असं शहा यांनी म्हटलं.
News English Summary: Shiv Sena, Akali Dal left BJP. Shiv Sena left BJP last year. The Akali Dal left the NDA on the issue of the Agriculture Bill. Shiv Sena and Akali Dal were old allies of BJP. His split with the BJP came as a shock to the BJP-led NDA. Amit Shah reacted to this in an interview given to ‘Network 18’. The NDM still has more than 30 parties. Shiv Sena and Akali Dal left BJP. We did not leave them alone, ‘said Amit Shah.
News English Title: Union Home Minister Amit Shah made his stand clear about alliance with Shivsena News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON