22 January 2025 3:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या
x

आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का देण्यासाठी अमित शहांची दिल्लीत बैठक?

Amit Shah

नवी दिल्ली, ०९ ऑगस्ट | विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे दोघेही दिल्लीत दाखल झाले आहेत. यासोबतच भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे जयकुमार रावळ निरंजन डावखरे हे देखील दिल्लीत आज उपस्थित आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षात नेमकी काय खलबतं सुरू आहेत याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र सर्व नेते हे संघटनात्मक कामासाठी दिल्लीत आले असल्याचं चंद्रकांत पाटील यांच्याकडून सांगण्यात आल आहे.

खासदारांची दिल्लीत आज बैठक:
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले खासदारांची दिल्लीत आज बैठक होणार आहे. रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी ही आज संध्याकाळी बैठक पार पडेल. केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने सामील झालेले मंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी आज ही बैठक आयोजित केली असल्याचं भारतीय जनता पक्षाकडून सांगण्यात येते आहे. मात्र या बैठकीनंतर महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यातही एक बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणूकबाबत चर्चा:
काही महिन्यानंतर होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेची बनवलेली आहे. शिवसेनेला मोठा धक्का देण्यासाठी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रणनीतीवर आज गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Union Home minister Amit Shah meeting with Maharashtra BJP leaders in Delhi news updates.

हॅशटॅग्स

#AmitShah(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x