काही गोष्टी सावर्जनिक करायच्या नसतात... त्या भेटीच्या वृत्तावर शहांनी संधी साधली?

मुंबई, २८ मार्च: काही गोष्टी सावर्जनिक करायच्या नसतात, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्याशी झालेल्या गुप्त बैठकीवर सूचक उत्तर दिलं आहे. दिल्लीत पत्रकारांनी पवारांसोबत भेटीबाबत छेडलं असता अमित शाहांनी सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत, असं सांगून प्रश्न उडवून लावला आहे. दरम्यान, अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकराच्या समीकरणात काही बदल होणार का? राजकीय खेळी पलटणार का? याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या निकटवर्तीय बड्या उद्योगपतीची प्रफुल पटेल यांनी भेट घेतल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं. अहमदाबादमधील फार्महाऊसवर २६ मार्चच्या रात्री ही भेट झाल्याची माहिती होती. विशेष म्हणजे पटेलांची संबंधित उद्योजकाशी भेट झाली, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही अहमदाबादेतच होते, असं बोललं जात होतं. परंतु या बैठकीला पवार उपस्थित होते का, याची पुष्टी मिळालेली नव्हती.
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेंना १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर देशमुख अडचणीत आले आणि शिवसेनेवर असलेला टीकेचा रोख राष्ट्रवादीकडे वळला. पवार यांनी देशमुख यांचं समर्थन करत त्यांचा राजीनामा घेतला नसला, तरी यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पवार, पटेल आणि शहांची गुप्त बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
News English Summary: Some things do not want to be made public, in such words, Union Home Minister Amit Shah has given a suggestive answer to a secret meeting with NCP President Sharad Pawar, veteran NCP leader and former Union Minister Praful Patel. When reporters in Delhi teased him about meeting Pawar, Amit Shah raised the question by saying that not everything can be made public. Meanwhile, after this statement of Amit Shah, will there be any change in the equation of the Mahavikasaghadi government in Maharashtra? Will the political game change? The discussion is starting to color.
News English Title: Union Home minister Amit Shah talked on news regarding meet with Sharad Pawar news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL