14 January 2025 5:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
x

अर्णब प्रकरणी भाजपचे सर्व नेते आक्रमक | पण अन्वय नाईकच्या न्यायाबद्दल शांतता

Union Home Minister Amit Shah, Arnab Goswami, Thackeray Government

नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर: रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्याने खळबळ माजली आहे. रायगड पोलिसांनी धडक कारवाई करत अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. दरम्यान, पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, न्यायालयाचे आदेश किंवा समन्स नसतानाही ही धडक कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून यानंतर करण्यात आला आहे.

तसेच अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. सध्या पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील सदर प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान भारतीय जनता पक्षाचे सर्वच नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मोदी सरकारमधील महत्वाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या विषयावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात ट्विट करताना अमित शहा म्हणाले की, ‘काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली आहे. महाराष्ट्र राज्याकडून रिपब्लिक आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात होणारा सत्तेचा गैरवापर हा लोकशाहीचा चौथा खांब आणि एका व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे. प्रेसवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध केलाच पाहिजे”.

 

News English Summary: All the leaders of the Bharatiya Janata Party are seen to be aggressive. Important leaders in the Modi government and Union Home Minister Amit Shah have also reacted sharply to the issue. Tweeting in this regard, Amit Shah said, “Congress and its allies have once again brought shame to democracy. The abuse of power by the state of Maharashtra against the Republic and Arnab Goswami is the fourth pillar of democracy and an attack on the freedom of one person. This has once again reminded me of the emergency. The attack on the press must be condemned.

News English Title: Union Home Minister Amit Shah twitted after Arnab Goswami arrest news updates.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x