23 February 2025 1:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

केजरीवालांच्या विकास कामांपुढे भाजप हतबल; देशाच्या गृहमंत्र्याचा चक्क पॅम्प्लेट वाटपात सहभाग

Delhi Assembly Election 2020, Union Home minister Amit Shah

नवी दिल्ली: अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीला भाजपने आता हिंदू-मुस्लीम आणि भारत-पाकिस्तान असाच रंग देण्याची पुरेपूर योजना आखली आहे. दिल्लीतील शाहीन बागेत सीएए, एनआरसीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या आडून भारतीय जनता पक्षाने संपूर्ण निवडणूक हिंदू-मुस्लिम आणि पाकिस्तान अशी रंगवली आहे. अगदी उदाहरण द्यायचे झाल्यास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मागच्या सोमवारी आपल्या प्रचारसभेत भाजप समर्थकांना ‘गोली मारो’च्या घोषणा द्यायला उद्युक्त केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी दिल्लीचे लोकसभेतील खासदार प्रवेश वर्मा यांनीही दिल्लीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास आपल्या मतदारसंघातील सरकारी जमिनींवरील सर्व मशिदी हटविण्याची घोषणा केली. त्यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानला हरवायला ३ दिवसही लागणार नाहीत, अशी ग्वाही एनसीसीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना दिली, ज्याचा उल्लेख करण्याची वास्तविक कोणतीही गरज नव्हती.

दरम्यान, केजरीवाल सरकारने शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, वीज आणि पाण्याच्या मूलभूत प्रश्नांवर केलेल्या भरीव कामगिरीने आणि विकासाच्या मुद्यांवर भारतीय जनता पक्षाला घाम फोडल्याचे पाहायला मिळत आहे. झारखंड मधील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करून तगडी फौज केजरीवालांविरोधात उभी करणार असल्याचं चित्र आहे. त्यासाठी देशभरातील तब्बल २००, खासदार, ७० केंद्रीय मंत्री आणि ११ विद्यमान आणि माजी मुख्यमंत्री दिल्लीमध्ये प्रचारासाठी ठाण मांडून आहेत.

त्यात भाजपचे प्रचारक शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, वीज आणि पाण्याच्या मूलभूत प्रश्नांवर केजरीवालांना घेरण्याची धमकच दाखवू शकत नाहीत. त्यामुळे संपूर्ण निवडणूक धार्मिक विषयांवर केंद्रित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध झालेल्या सर्व्हमध्ये देखील केजरीवाल यांच्यासमोर भाजपचा सुपडा साफ होण्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. त्यानुसार भाजपाला अवघ्या ४-५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र झारखंड निकालानंतर देशात भाजप’विरुद्ध वातावरण अधिक गडद होण्याच्या धास्तीने भाजपचे चाणक्य धास्तावल्याचे चित्र आहे. भाजपाच्या ताब्यात असलेल्या सर्व राज्यांचा विचार केल्यास त्यातील एकाही राज्यात शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, वीज आणि पाण्याच्या मूलभूत प्रश्नांवर केजरीवाल सरकारने केलेल्या प्रगती प्रमाणे १० टक्के देखील कामं झालेली नाहीत आणि त्यामुळे एखादं उदाहरण देखील ते दिल्लीतील मतदारांसमोर ठेऊ शकत नाहीत.

त्यामुळे जाहीरनाम्यात मोफत विषयांचा भडीमार करण्यात आला आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग भाजपकडे शिल्लक नाही. त्यात केजरीवाल यांना मिळणार प्रचारातील प्रतिसाद देखील मोठा आहे. त्यामुळे भाजपने देशभरातील स्वतःचे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यांचे माजी मंत्री आणि मुख्यमंत्री ते थेट स्वतः देशाचे गृहमंत्री देखील गल्ल्यांमध्ये पॅम्प्लेट वाटण्याचा सपाटा लावून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग स्वीकारल्याचं दिसतं आणि यावरून भारतीय जनता पक्षाची केजरीवाल यांनी केलेली दयनीय अवस्था सिद्ध होताना दिसत आहे.

 

Web Title:  Union Home Minister making distribution of BJP Pam plates for Delhi Assembly Election 2020.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x