18 January 2025 1:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना माहित नाही, चार्ट बनवल्यानंतरही मिळेल कन्फर्म तिकीट, तात्काळ तिकिटापेक्षाही पडेल तिकीट Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग Home Loan EMI | 90% कर्जदारांना माहित नाही, गृहकर्जाचा EMI थकवल्यास बँक अशी टप्प्याटप्याने कारवाई करते, लक्षात ठेवा
x

आम्ही शेतकऱ्यांच्या सूचना आणि सल्ल्यांवर विचार करण्यास तयार आहोत - गडकरी

Union Minister Nitin Gadkari, Farmers protest, New Farm Laws

नवी दिल्ली, १५ डिसेंबर: दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 20वा दिवस आहे. परंतु, अद्याप देखील कृषी कायद्याबाबत तोडगा निघू शकला नाही. विरोधकांकडून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात येतोय. काँग्रेस खासदार राहुल गांधी अधिक आक्रमक होत आहेत. अशावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आमचं सरकार हे शेतकऱ्यांसाठी समर्पित सरकार आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या सूचनांवर विचार करण्यास तयार आहोत, असं म्हटलंय. त्याच बरोबर ज्येष्ठ समाजसेवर आण्णा हजारे हे या आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नसल्याचंही गडकरी म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एएनआयला मुलाखत दिली. ‘केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी समर्पित सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या सूचना आणि सल्ल्यांवर विचार करण्यास तयार आहोत. आमच्या सरकारकडून शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांनी पुढे येऊन कृषी कायदे समजून घ्यायला हवे’, असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं आहे.

“जर चर्चाच नसेल तर यामुळे गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतात. जर चर्चा असेल तर तोडगा काढता येऊ शकतो आणि संपूर्ण प्रकरणच मिटेल. शेतकऱ्यांना न्याय आणि दिलासा मिळेले. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत,” असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांनी पुढं येऊन सरकारशी चर्चा करुन हे तिन्ही कृषी कायदे समजावून घेतले पाहिजे. शेतकऱ्यांच्या सूचनांचं स्वागतच आहे, कारण शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमचं सरकार काम करतंय. मात्र, काही घटकांडून अप्रचार करण्यात येत आहे, शेतकरी आंदोलनाचा दुरुपयोग केला जात आहे, असेही गडकरी यांनी म्हटलंय.

 

News English Summary: Today is the 20th day of the farmers’ agitation on the Delhi border. However, a settlement has not yet been reached on agricultural law. Opposition groups called for a boycott of the assembly. Congress MP Rahul Gandhi is becoming more aggressive. Union Minister for Road Transport and Highways Nitin Gadkari said, “Our government is a government dedicated to the farmers and we are ready to consider the suggestions of the farmers.” At the same time, Gadkari said that he did not think that Anna Hazare would join the agitation.

News English Title: Union Minister Nitin Gadkari talked over Farmers protest against New Farm Laws in Delhi news updates.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x