22 February 2025 7:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

कोरोना लसीकरण | महाराष्ट्रात ५६% लसी वापरल्याच नाहीत, नियोजनाचा अभाव - प्रकाश जावडेकर

Union Minister Prakash Javadekar, Maharashtra, Vaccination

मुंबई, १७ मार्च: देशात कोरोना संक्रमणानं पुन्हा एकदा वेग घेतलेला दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातून समोर येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैंकी ५६ टक्के लसीचा वापरच करण्यात आलेला नाही, असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.

या संदर्भात प्रकाश जावडेकर यांनी एक ट्विट केलं आहे. ‘केंद्राकडून महाराष्ट्राला आतापर्यंत ५४ लाख लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत. परंतु, महाराष्ट्रानं केवळ २३ लाख लसीच्या डोसांचाच वापर केला आहे. याचाच अर्थ ५६ टक्के लसीचा वापरच झालेला नाही’ असा आरोप जावडेकर यांनी केला आहे. यानंतरही, शिवसेनेचे खासदार संसदेत राज्यासाठी अतिरिक्त लशीचा पुरवठा करण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेमध्ये बोलातना महाराष्ट्राला अधिक प्रमाणात लसींचे डोस देण्यात यावेत अशी मागणी केली होती. त्यानंतर जावडेकरांनी हे ट्विट केलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेऊन राज्याला २ कोटी २० लाख डोस उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

 

News English Summary: Maharashtra Government had only used 23 lakh vaccines out of the total 54 lakh vaccines sent to the state, till 12th March. 56% vaccines remained unused. Now, Shiv Sena MP asks for more vaccines for the state. First mismanagement of pandemic now poor administration of vaccines said Union Minister Prakash Javadekar.

News English Title: Union Minister Prakash Javadekar slams State govt over vaccinations program news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x