28 January 2025 7:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

कांदा ८० किलो झाला असता आंदोलन व टीका करणाऱ्या या नेत्यांना देश चालविण्याचा अर्थ कळला? सविस्तर

Union Minister Onion High Rates Twit

नवी दिल्ली: आज देशभर कांद्याच्या भावाने १८० किलोच्या आसपास एवढा उच्चांक गाठलेला असताना देशभर मोदी सरकारवर टीका होतं आहे. त्यात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लोकांच्या भावना लक्षात घेऊन आणि उपाय योजनावरून संसदेत प्रश्न उपस्थित केला आणि त्यावर ‘मी आणि माझ्या घरात कोणीही कांदा खात नाही’ असं उत्तर देत त्यांच्या बुद्धीच्या विचारशक्तीचा उंची सिद्ध केली.

मात्र विषय केवळ अर्थमंत्री सीतारामन यांच्यापुरता मर्यादित नसून, २०१० मध्ये याच भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांनी कांद्याचे भाव ८० रुपये प्रति किलो झाले असताना रस्त्यावर उतरत मोठा घाम गाळत लोकांच्या भावना तत्कालीन सरकारकडे मांडल्या होत्या. त्यात सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या स्मृती इराणी यांनी तर कहरच केला होता असं म्हणावं लागेल. एका ट्विटमध्ये त्यांनी ‘सध्या प्राप्तिकर विभाग मोठ्या सौद्यांवर नजर ठेऊन आहे आणि त्यामुळे कांदा खरेदी करू नका’ असं म्हटलं होतं.

त्यानंतर विषय केवळ स्मृती इराणी यांच्या पुरता विषय मर्यादित नव्हता, तर सध्याचे आणि तेव्हाही पंचतारांकित आयुष्य जगणारे कट्टर मोदी भक्त देखील त्याच रांगेत उभं राहून कांद्याच्या किमतीने हैराण झाले होते आणि सरकारवर तुटून पडले होते. मात्र, आज हेच भाजप नेते सामान्य माणसाला शोधूनही सापडणार आणि त्यांना सामान्य माणसासाठी किती प्रामाणिक तळमळ होती हे आजच्या परिस्थितीवरून सिद्ध होतं आहे. देश चालवणं आणि समाज माध्यमांचं अकाउंट चालवणं त्यांना सारख्याच गोष्टी वाटल्या असाव्यात असंच मत व्यक्त करून गप्प पाहत राहण्यापलीकडे सामान्य माणसाच्या हातात दुसरं काहीच नाही.

 

Union Minister Smriti Irani old twit on Onion High Price gone Viral on Social Media

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x