सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा पैसा लस आणि ऑक्सिजन खरेदीसाठी वापरा | १२ विरोधी पक्षांच मोदींना पत्र
नवी दिल्ली, १३ मे | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नवे संकट उभे ठाकले आहे. या स्थितीत केंद्र सरकारने मोफत लसीकरण मोहीम राबवावी, सेंट्रल व्हिस्टासारख्या प्रकल्पासाठी खर्च केली जात असलेली रक्कम हे काम थांबवून आरोग्य क्षेत्रासाठी वापरावी, बेरोजगारांना मासिक ६ हजार रुपये द्यावेत, अशा एकूण ९ मागण्यांचे खुले पत्र १२ विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना लिहिले आहे.
संबंधित खुल्या पत्रावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह १२ विरोधी पक्षनेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणीही यात आहे. विरोधी पक्षांनी यापूर्वीही काही सल्ले दिले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचे परिणाम आता देश भोगत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
नेमक्या कोणत्या मागण्या आहेत विरोधी पक्षांच्या;
- देशांतर्गत किंवा विदेशातून शक्य तेथून लस खरेदी करण्यात यावी.
- संपूर्ण देशात मोफत लसीकरण मोहीम तत्काळ सुरू करण्यात यावी.
- देशांतर्गत लसनिर्मितीसाठी परवाना बंधनकारक करण्यात यावा.
- लसीसाठी ३५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा.
- सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर बंदी आणावी. यासाठी वापरला जाणारा पैसा लस आणि ऑक्सिजन खरेदीसाठी वापरावा.
- पंतप्रधान निधीसह इतर सर्व खासगी निधीतील पैसा वैद्यकीय उपचारांसाठी, उपकरणांसाठी वापरावा.
- बेरोजगारांना मासिक ६ हजार रुपये देण्यात यावेत.
- सर्व गरजूंना मोफत धान्य पुरवावे.
- कृषी कायदे मागे घ्यावेत. जेणेकरून महामारीत फटका बसलेले लाखो शेतकरी देशातील जनतेसाठी अन्नधान्य उत्पादन करू शकतील.
- १२ विरोधी पक्षांची पंतप्रधानांकडे मागणी, निधीच्या वापराबाबतही केल्या सूचना
News English Summary: The second wave of corona in the country has created a new crisis. In this situation, the central government should launch a free vaccination campaign, stop spending on projects like Central Vista and use it for the health sector, pay Rs 6,000 monthly to the unemployed, a total of 9 open letters to the Prime Minister.
News English Title: Use money of Central Vista Project to buy vaccines and oxygen during corona pandemic letters from 12 opposition parties to PM Modi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL