6 November 2024 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

उत्तरप्रदेशमध्ये संयुक्त किसान मोर्चा आणि भाजपामध्ये रंगले पोस्टर वॉर

Uttar Pradesh Assembly Election 2022

लखनऊ, ०१ ऑगस्ट | जो पर्यंत कृषी कायदे हे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत लखनऊ शहराचे चारही सीमावरील रस्ते बंद करु आणि आंदोलन सुरूच ठेवू’ असे वक्तव्य शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले होते. याला प्रत्युत्तर देताना उत्तरप्रदेश भाजपाने एक पोस्टर शेअर केले होते. यावर संयुक्त किसान मोर्चानेही एक पोस्टर शेअर करत पलटवार केला आहे. ‘पळा, पळा शेतकरी येत आहेत, किसान एकता जिंदाबाद’ या आशयाचे पोस्टर ट्वीट करून भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे.

उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या विधानाला निवडणुकीशी जोडून पाहिले जात आहे. टिकैत यांनी लखनौच्या चारही सीमेवरील रस्ते बंद करु असे वक्तव्य केले होते. यावर भाजपाने एक ट्वीट केले होते की, “ओ भाई लखनऊ मध्ये येत आहात, तर जरा सांभाळून”. अशा आशयाचे एक पोस्टर शेअर केले आहे.

भाजपाद्वारे ट्वीट केलेल्या कार्टून मध्ये बाहूबली लिहिलेला एक माणूस म्हणतो की, “ऐकले आहे की लखनऊला जात आहात तुम्ही. तेथे कोणाशी पंगा घेऊ नका, तेथे योगी बसलेला आहे. काटेरी तारेचे कुंपन लावून, त्यावरच पोस्टर लावून ठेवा”, या आशयाच्या पोस्टरमधून भाजपाने शेतकऱ्यांना इशारा दिला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 posters war Bhago re Bhago farmers are coming news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x