17 April 2025 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ | भाजपमध्ये भूकंपाचे संकेत | १२६ विद्यमान आमदार पक्षांतराच्या तयारीत

Uttar Pradesh Corona pandemic

लखनऊ, ०४ जून | उत्तर प्रदेशाच्या राजकारणातून भूकंपाचे संकेत मिळू लागले आहेत. कोरोना आपत्तीत देश आणि जगभरात योगी सरकार आणि मोदी सरकारच्या कामांची पोलखोल झाली आहे आणि परिणामी जनता भाजपवर प्रचंड नाराज असल्याचे संकेत भाजपच्या आमदारांना मिळाले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील २०२२ मधील विधानसभा निवडणुकीपूर्वी हे आमदार समाजवादी आणि बसपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. परिणामी भाजपमध्ये देखील धावपळ सुरु झाली आहे.

विशेष म्हणजे केंद्रातील मोदी सरकरमध्ये जशी मोदींची एकाधिकारशाही चालते तशीच यूपीत योगी आदित्यनाथ यांची देखील एकाधिकारशाही अनुभवून आमदार संतप्त असल्याचं वृत्त आहे. दरम्यान, कोरोना आपत्तीत झालेल्या पंचायत निवडणुकीत भाजप आमदारांना भविष्यातील पराभवाचे संकेत प्राप्त झाले आहेत. दुसरीकडे मोदी आणि योगीचा करिष्मा देखील चालणार असून उलट त्यांच्यामुळे मतदार मतं देणार नाहीत असं अनेक भाजप आमदारांचं मत झालं आहे. त्यामुळे भाजपचे आमदार वेळीच सतर्क झाले आहेत, तसेच हिंदुत्वाचा मुद्दा कुचकामी ठरणार असल्याचे संकेत वाराणसी, अयोध्या आणि मथूरेतील पंचायत निवडणुकीच्या निकालातून सिद्ध झालं आहे. त्यामुळे भाजप आमदारांमध्ये धास्ती वाढली आणि त्यामुळेच दिल्लीतील मोदी-शहांसहित सर्व नेते परिस्थतीवर लक्ष ठेवून आहेत.

त्यामुळे सात महिन्यांनंतर होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपमध्ये एका मोठ्या बंडाची तयारी होत आहे. उच्चपदस्थ सूत्रांनुसार विद्यमान १२६ आमदार भारतीय जनता पक्षाशी फारकत घेऊन दुसऱ्या पक्षात सामील होण्याच्या बेतात आहेत, असा गौप्यस्फोट योगी आदित्यनाथ सरकारच्या एका मंत्र्याने प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

सरकारमध्ये मंत्री आणि आमदारांचे काहीही ऐकून घेतले जात नाही. तसेच त्यांना महत्त्वही दिले जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणांवर नाराजी आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वामार्फत राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी अन्य सदस्यांसोबत सरकारच्या स्थितीचे आकलन केल्यानंतर दावा केला होता की, सर्व काही ठीक आहे. नेतृत्वात बदल होणार नाही. कारण आम्ही मंत्री आणि आमदारांशी चर्चा केलेली आहे.

मात्र, मंत्री बृजेश पाठक यांनी सांगितले की, बी. एल. संतोष आणि अन्य केंद्रीय नेत्यांनी लखनौत बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला. आमदारांशी थेट संवाद साधण्यात आला नाही. या बैठकीत फक्त कोरोना स्थिती आणि आगामी निवडणुकीच्या रणनीतीवरच चर्चा झाली. बंडाचे निशाण भारतीय जनता पक्षाचे आ. राकेश राठोड यांनी सरकारविरुद्ध याआधीच बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. त्यांचा आरोप आहे की, सरकारच्या लेखी आमदारांना महत्त्वच नाही. कोणी बोलले, तर कायद्याचा बडगा उगारून त्याची बोलती बंद केली जाते. त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन बघता ते भाजपविरुद्ध बंड करण्याच्या मन:स्थितीत असल्याचे संकेत मिळतात.

फिरोजाबादचे आ. राम गोपाल लोधी यांच्यासह दुसरे आमदारही भारतीय जनता पक्षाविरोधी भूमिका घेत निवडणुकीआधी दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत दिसतात. सूत्रानुसार अशा सर्व आमदारांवर बसपा आणि समाजवादी पार्टी लक्ष ठेवून आहे.

 

News English Summary: There are signs of an earthquake in the politics of Uttar Pradesh. The Corona disaster has disrupted the work of the Yogi government and the Modi government in the country and around the world, and as a result, BJP MLAs have received indications that the people are very angry with the BJP. Therefore, it is reported that this MLA is in touch with Samajwadi Party and BSP before the 2022 Assembly elections in Uttar Pradesh. As a result, the BJP has also started running.

News English Title:  Uttar Pradesh Assembly Election 2022 almost 126 BJP MLA may leave BJP to join other parties news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या