२०२२ मधील यूपीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये चिंता | मोदी-शहा आणि RSS दरम्यान गुप्त बैठका
लखनऊ, २३ मे | सध्या कोरोना आपत्तीमुळे देशात चिंतेचं वातावरण असलं तरी देखील उत्तर प्रदेशात अत्यंत भीषण परिस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय. कोरोना आपत्तीमुळे उत्तर प्रदेशात हाहाकार मजल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत आणि कोरोना आपत्ती २०२२ पर्यंत लांबणार असेच संकेत मिळत आहेत. परिणामी भाजप आणि आरएसएस’मध्ये चिंतेचं वातावरण असल्याचं वृत्त आहे. कारण उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये पराभव झाल्यास २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत देखील मोदी सरकार जाणार हे जवळपास निश्चित होणार आहे.
याच पाश्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आरएसएस’च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत बैठक झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत आरोग्य व्यवस्था आणि गंगा नदी तसेच गंगा घाटावरील कोरोना मृतांचे शव देशातील चर्चचा विषय ठरला आहे. परिणामी स्वतः मोदींचा देखील २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत पराभव होऊ शकतो किंवा मोदींचा मतदारसंघ बदलला जाऊ शकतो. अन्यथा मोदींना दोन लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता आधीच राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
भाजपाला उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा कामी येणार नाही याचे संकेत नुकत्याच पार पडलेल्या पंचायत निवडणुकीत पाहायला मिळाले आहेत. कारण प्रभू रामाची भूमी म्हणजे अयोध्येत देखील भाजपचा पराभव होऊन समाजवादी पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तसेच मथुरा आणि वाराणसीत देखील विरोधीपक्ष मोठा ठरला असून भाजपच्या वाट्याला अत्यंत कमी जागा आल्या आहेत. त्यानंतर भाजपमध्ये अजूनच चिंता वाढली आहे. उत्तर प्रदेशात २०२२ यामध्ये मतदारांकडून मतं मागायची तरी कोणत्या विषयावरून हाच भाजपच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
News English Summary: Despite the current state of concern in the country due to the Corona disaster, the situation in Uttar Pradesh is dire. The Corona disaster has caused havoc in Uttar Pradesh. In particular, there are indications that Uttar Pradesh will hold assembly elections in 2022 and the Corona disaster will last till 2022. As a result, there is an atmosphere of concern between the BJP and the RSS.
News English Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 BJP RSS is in worried about result after situation change due to corona pandemic news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो