5 February 2025 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: APOLLO HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR
x

उत्तर प्रदेश | निवडणुकीत योगी नव्हे तर अखिलेश यांची हवा | बसपाचे ९ आमदार भेटीला

Uttar Pradesh Assembly Election 2022

लखनऊ, १५ जून | युपीमध्ये सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. बहुजन समाज पार्टीच्या ९ बंडखोर आमदारांनी आज समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि युपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच यूपीतील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. बहुजन समाज पार्टीचे हे सर्व आमदार आज सकाळी ११ वाजता थेट लखनऊ येथील समाजवादी पार्टीच्या मुख्यालयात पोहचले आणि त्यांनी अखिलेश यादव यांच्याशी बराच वेळ चर्चा केली.

बहुजन समाज पार्टीच्या बंडखोर आमदारांनी समाजवादी पक्षाच्या प्रमुखांची भेट घेतल्यानं हे आमदार भविष्यात समाजवादी पक्षाची वाट धरू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ते लवकरच अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा झेंडा हाती घेतील. मंगळवारी अखिलेश यादव यांची भेट घेणाऱ्यांमध्ये असलम राइनी, असलम अली चौधरी, मुज्तबा सिद्दीकी, हाकीम लाल बिंद, हरगोविंद भार्गव, सुषमा पटेल, वंदना सिंह, रामवीर उपाध्याय, अनिल सिंह या महत्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.

२०१७ मधील विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे १९ आमदार विजयी झाले होते. मात्र नंतर आंबेडकरनगर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत बहुजन समाज पार्टीने आपली ही जागा गमावली होती. यानंतर रामवीर उपाध्याय आणि अनिल सिंह यांना बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत, पक्षातून काढून टाकले होते. गेल्या वर्षी पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीदरम्यान बसपाच्या सात आमदारांनी बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारास समर्थन देण्यास स्पष्ट नकार दिला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 BSP 9 MLAs meet Akhilesh Yadav in office news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x