कोरोना आपत्तीत जगभरातून टीका झालेल्या उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना आत्तापासूनच निवडणुकांचे वेध
लखनऊ, ०३ जून | संपूर्ण देशात कोरोना काळात सर्वात भयावह स्थिती पाहायला मिळाली ती उत्तर प्रदेश राज्यात. जगभरात ते चित्र उमटले. परंतु, आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. “आम्ही कोरोनाला हरवलं, आता विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवू”, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. 2022 मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. परंतु, कोरोना काळात जे प्रचंड अपयश योगी सरकारला आले आहे ते पाहता ही निवडणूक योगी सरकार आणि भारतीय जनता पक्षासाठी मोठी कठीण ठरू शकते. मात्र, या परिस्थितीतही विधानसभा निवडणुकांसाठी योगी आदित्यनाथ यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे.
जागरण वृत्त समुहाच्या संपादकीय मंडळाशी बोलताना येत्या विधानसभा निवडणुकांसंदर्भातही योगी आदित्यनाथ यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत उत्तर प्रदेश सरकारने यशस्वी कामगिरी केल्याचे म्हणत स्वतः पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले होते. आता मोदींच्या याच कौतुकामुळे योगी आदित्यनाथ यांचाही आत्मविश्वास दुणावला आहे. उत्तर प्रदेशमधील कोरोनास्थिती आटोक्यात आणल्याने योगी आदित्यनाथ समाधानी असल्याचे म्हटले जात आहे.
जगभरात ज्याचे पडसाद उमटले आणि देश हादरला त्या गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांबद्दलच्या घटनेवरही योगी आदित्यनाथ यांचे स्पष्टीकरण आता आले आहे. “सध्या अनेकजण अफवा पसरविण्यात आणि वातावरण दुषित करण्याचं काम करत आहेत”, असे योगी आदित्यनाथ यांचे म्हणणे आहे.
News English Summary: The worst situation in the country during the Corona period was in the state of Uttar Pradesh. The picture spread all over the world. But now the Uttar Pradesh chief minister is looking forward to the elections. Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath has claimed, “We lost to Corona, now we will win the Assembly elections too.”
News English Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 chief minister Yogi Adityanath is looking forward to the elections news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम