1 January 2025 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | नोकरी असो किंवा व्यवसाय महिन्याला पेन्शन हवी असेल तर, 'हा' मार्ग ठरेल फायद्याचा NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉकला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड सहित डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, 33% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबद्दल खुशखबर आली, मल्टिबॅगर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: SUZLON
x

योगीना पर्यायी नेतृत्व उभं करण्याच्या हालचाली? | ‘नमामि गंगे’च्या पोस्टरवरूनही मोदी-शहा बाजूला

Uttar Pradesh Assembly Election 2022

नवी दिल्ली, 10 जून | उत्तर प्रदेशात कोरोना आपत्तीत झालेल्या नाचक्कीमुळे मोदींना देखील लोकसभा निवडणूक महागात पडणार असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. देशभरापासून ते जगभर उत्तर प्रदेशातील घटनांमुळे भाजपवर टीका झाली आहे. त्यामुळे दिल्लीतील नैतृत्व योगींवर प्रचंड नाराज आहेत. अगदी फोटोवर देखील योगींपासून अंतर राखण्यास सुरुवात झाली आहे. तसेच उत्तर प्रदेशात ‘ब्राह्मण’ राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे.

त्याचाच भाग म्हणजे उत्तर प्रदेश सरकारने नव्याने जारी केलेल्या ‘नमामि गंगे’ अभियानाच्या पोस्टरवर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची छायाचित्रे नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्य योगी आदित्यनाथ यांच्यात सुरू झालेले शीतयुद्ध थांबविण्याची चिन्हे दिसत नसल्याचे संकेत मिळतात. उत्तर प्रदेश सरकारने ‘नमामि गंगे’ या पोस्टरवरून मोदी आणि शहा यांची छायाचित्रे हटविण्याची ही पहिलीची वेळ आहे.

दुसरीकडे, आपसातील शीतयुद्धामुळे योगी आदित्यनाथ यांनीच हे पाऊल उचलले असावे, असे मानले जात आहे. तथापि, मोदी आणि शहा यांनी विधानसभेच्या आगामी निवडणुकीत ब्राह्मण समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. योगी यांचे महत्त्व कमी करण्यासाठी पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे सूत्रांनी सांगितले. योगी आदित्यनाथ राज्यात ठाकूर समुदायाला महत्त्व देत ब्राह्मण समाजाची उपेक्षा करीत आहे, असा त्यांच्यावर आरोप आहे.

त्यामुळे पंतप्रधान मोदी ब्राह्मण समाजाला भाजपसोबत जोडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ए.के. शर्मा यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न केला; आता जितीन प्रसाद यांना भाजपमध्ये सामील करून ब्राह्मण समाजाला आकर्षित केले जात आहे. योगी आदित्यनाथ यांनीही हा डाव ओळखून आपली प्रतिमा सुधारण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. नमामि गंगे अभियानाचे नवीन पोस्टर, त्यांच्या या प्रयत्नांचाच एक भाग आहे.

 

News English Summary: Political experts are saying that the Lok Sabha elections will be costly for Modi due to the Corona disaster in Uttar Pradesh. Incidents in Uttar Pradesh have drawn criticism from across the country and the world. Therefore, the leadership in Delhi is very angry with the yogis. Even on the photo, the distance from the yogi has begun to grow. Also in Uttar Pradesh, ‘Brahmin’ politics has started.

News English Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 Cold war between Yogi Adityanath and Narendra Modi is began news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x