मोठा निर्णय | भाजपाला पराभवाची शंका? | आगामी यूपीच्या निवडणुकीत मोदी यांच्या ऐवजी योगींचा चेहरा
लखनऊ, ०८ जून | आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आणि आरएसएसला पराभवाची शंका सतावते आहे. परिणामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आरएसएसने भारतीय जनता पक्षासाठी योजना तयारी केली आहे. त्यानुसार 2022 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासोबतच महत्वाचा निर्णय म्हणजे आता पंतप्रधान मोदी विधानसभा निवडणुकीत प्रमुख चेहरा म्हणून दिसणार नाहीत. यापूर्वी झालेल्या राज्यांच्या निवडणुकीत मोदींच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे संघाचे म्हणने आहे. त्याची परिणीती पुन्हा आल्यास २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत पराभव निश्चित होणार असं आरएसएसला वाटत असल्याने सतर्कता बाळगण्यात येतं आहे.
संघाच्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली पंतप्रधान मोदींचा चेहरा प्रादेशिक नेत्यांसमोर ठेवल्याने त्यांची प्रतिमा खराब झाल्याचे संघाचे मत आहे. त्यामुळे मोदी यांची प्रतिमा कायम ठेवण्यासाठी संघाची धडपड सुरु असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर संघाने उत्तर प्रदेशची निवडणूक योगी यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात शरद पवार कुटुंबीयांना एकत्र आणण्याचीही चर्चा सुरु आहे.
पश्चिम बंगालमधील ममता विरुद्ध मोदींमुळे नकारात्मक संदेश:
सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता विरुद्ध मोदींच्या रणनीतीमुळे भारतीय जनता पक्षाला नुकसान झाल्याचे संघातील नेत्यांचे म्हणणे आहे. या बैठकीत पश्चिम बंगालमधील निवडणुकांबाबत गंभीर विचार आणि आढावा घेण्यात आला. ही बैठक दिल्लीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबोले यांच्या उपस्थितीत झाली.
या निवडणुकीत राष्ट्रीय स्तरांवरील नेता समोर असल्याने राजकीय विरोधकांना मोठ्या प्रमाणावर टिका करायला संधी मिळाली. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेचे नुकसान झाले. कारण यापूर्वीही 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्याविरोधात आणि नंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्याविरूद्ध या रणनीतीचा फायदा झाला नाही.
उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम मते निर्णायक:
उत्तर प्रदेश राज्यात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनजी यांनी चलाखीने मोदी यांना मुस्लिमविरोधी असल्याचे टॅग लावले आणि भाजपाला मुस्लिम विरोधी प्रचार नडला आणि त्याचा थेट फायदा तृणमूलला झाला. त्याच प्रकारे यूपीमध्येही मुस्लिम मते निर्णायक असल्याने सुमारे 75 जागेंवर याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे उत्तर प्रदेशात मोदी यांना समोर केल्यास त्यांचा फायदा थेट समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला होईल अशी आरएसएसला शंका आहे.
योगींवर या कारणांमुळे जवाबदारी पण २०२४ साठी मोदींची प्रतिमा जपण्यासाठी योगींचा बळी?
सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा देखील मुस्लिमविरोधी मनाली जाते. तसेच योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होण्यापूर्वी गोरखपूर येथील मंदिराचे महंत होते. त्यात मध्यंतरी झालेल्या निवडणुकीत याच गोरखपूर मतदार संघातही भाजपाला फटका बसल्याच पाहायला मिळालं होतं. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्याचा निर्धार संघाने केला आहे.
संघाने घेतला पुढाकार, दत्तात्रेय होसबोल लखनौमध्ये राहणार:
दिल्लीत दोन चाललेल्या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत हे एकच दिवस थांबले. या बैठकीत प्रांतिक मुख्यालयाचे प्रभारी व इतर जबाबदाऱ्याबाबतही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यासोबचत सहकार्यवाह दत्तात्रय होसबोल यांचे कार्यालय नागपूर ऐवजी आता लखनऊमध्ये असणार आहे. माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक भागवत यांच्यात समन्वयाचे काम करतील आणि बहुधा ते दिल्लीतच राहतील. सरसंघचालक नागपुरमध्ये राहणार असून सहकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांना भोपाळ मुख्यालय देण्यात आले आहे.
News English Summary: The Bharatiya Janata Party and the RSS are worried about defeat in the forthcoming Assembly elections. As a result, the RSS has prepared a plan for the Bharatiya Janata Party for the Uttar Pradesh Assembly elections. Accordingly, it has been decided to contest the Assembly elections in 2022 under the leadership of Chief Minister Yogi Adityanath. The decision was taken at a meeting of the Rashtriya Swayamsevak Sangh in Delhi. At the same time, the important decision is that now Prime Minister Modi will not be seen as a major face in the Assembly elections.
News English Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 decision PM Narendra Modi will no longer be the face in the assembly elections news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO