22 November 2024 8:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

ममतादीदी इन ऍक्शन! पाडणार म्हणजे पाडणार | यूपीत निवडणुकीपूर्वी पिके आणि अखिलेश यांच्यात उच्चस्तरीय बैठक

Prashant Kishor

लखनऊ, ०५ जून | पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मोदी-शहा यांच्यासहित देशभरातील भाजपाला धूळ चारणाऱ्या ममता बॅनर्जी आता देशभरात मोदी-शहांच्या हात धुवून मागे लागल्याचं पाहायला मिळतंय. भाजप आगामी म्हणजे २०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीत पराभूत झाल्यास २०२४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्तापालट होऊन मोदी पायउतार होतील हे जवळपास निश्चित होणार आहे. तसेच मेहनती आणि आक्रमक स्वभावाच्या तसेच राजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या ममतादीदी पंतप्रधान पदाच्या उमेदवार होण्याची शक्यता आता बळावली आहे. परिणामी त्या आक्रमक झाल्या असून संपूर्ण यंत्रणा कामाला लावत असल्याचं दिसतंय.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत संपूर्ण निवडणूक व्यूहरचनाकार पिके अर्थात प्रशांत किशोर आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील टोकाच्या वादानंतर आता ते येत्या फेब्रुवारीत उत्तर प्रदेशात भाजपाला धूळ चारण्यास कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत त्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे देखील समोर आलं आहे. त्यानुसार प्रसार माध्यमांना मिळालेल्या खात्रीलायक वृत्तानुसार पी.के. यांची उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी लखनौत दीर्घकाळ बैठक झाली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत अखिलेश यादव यांना फोन केला होता. त्यांच्या सांगण्यानुसार ही बैठक झाली. पश्चिम बंगालमध्ये पीके यांनी विजयाची व्यूहरचना केली होती. त्यामुळे यादव यांनी भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी पीके यांची मदत घ्यावी, असे बॅनर्जी यांना हवे आहे. २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत पीके हे यादव यांच्या फारच थोडे संपर्कात होते, कारण तेव्हा पीके काँग्रेसला सल्ला देत होते. दरम्यान, काँग्रेसच्या स्थूलपणा आणि अंतर्गत वाद संपताना दिसत नसल्याने तिथे वेळ वाया घालविण्यात काहीच अर्थ नसल्याचं त्यांचं व्यक्तिगत मत आहे. तसेच कॉग्रेसमध्ये अनेक वरिष्ठ नेते स्वतःलाच चाणक्य समजतात आणि त्यामुळे तेथे काम कारण कठीण आहे हे देखील यापूर्वीच त्यांनी अनुभवलं आहे.

दरम्यान, प्रशांत किशोर यांच्या I-Pac ने याबाबत बोलण्यास सध्या नकार दिला आहे. परंतु, यादव यांनी त्यांना योजना तयार करण्यास सांगितल्याचे समजते. अखिलेश यादव यांचा विजय व्हावा अशी बॅनर्जी यांची इच्छा आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विरोधक सक्रिय झाल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये तट पडले आहेत. पक्षाच्या दिल्लीतील श्रेष्ठींच्या पाठिंब्यावर आदित्यनाथ यांचे विरोधक बंडाचा झेंडा उंच करीत असल्याच्या अफवा आहेत. या परिस्थितीमुळे समाजवादी पक्षाला आपण भारतीय जनता पक्षाला पर्याय होऊ शकतो, अशी आशा आहे.

यासर्व गोष्टींची चुणूक भाजपाला आणि आरएसएस’ला लागल्याने ते कार्यरत झाले आहेत. मात्र कोरोना आपत्ती आधीच डोईजड झालेली असताना आणि शेतकरी आंदोलनं पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर उफाळणार आणि ग्रामीण उत्तर प्रदेशाच्या भागात भाजपाला मोठा फटका बसणार हे देखील भाजपच्या चिंतेचं कारण ठरलं आहे. परिणामी भाजप आणि आरएसएस सध्या गोंधळलेल्या स्थितीत आहे आणि त्याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकीत अयोध्या, मथुरा आणि वाराणसीत समाजवादी पक्षाने भाजपला दिलेला धोबीपछाड हे मुख्य कारण आहे.

 

News English Summary: West Bengal Chief Minister Mamata Banerjee had called Akhilesh Yadav on the issue. According to him, the meeting took place. In West Bengal, Prashant Kishor had devised a strategy of victory. Therefore, Banerjee wants Yadav to seek Prashant Kishor’s help in defeating the BJP. In the 2017 Assembly elections, Prashant Kishor had very little contact with Yadav, as he was advising the Congress at the time.

News English Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 meet between Prashant Kishor and Akhilesh Yadav news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradesh(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x