24 November 2024 11:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
x

आगामी युपी निवडणुका | भाजपने तंत्र बदललं, समाजवादी ऐवजी MIM'वर प्रतिक्रिया आणि विधानं करण्याचं?

Uttar Pradesh Assembly Election 2022

लखनऊ, ०४ जुलै | उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे, कोरोना आपत्तीत भारतीय जनता पक्षाची आणि योगींची नाचक्की झाल्याने पक्षावर मोठं राजकीय संकट ओढवलं आहे. त्यात समाजवादी पक्ष मोठी मजल मारण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याचे संकेत यूपीतील पंचायत निवडणुकीत आले होते आणि परिणामी भाजपकडे मतविभागणी हाच पर्याय शिल्लक असल्याचं पाहायला मिळतंय. त्यासाठी थेट समाजवादी पक्ष किंवा अखिलेश यादव यांना दुर्लक्षित किंवा त्यांच्यावर थेट हल्ला न करता एमआयएम प्रतिस्पर्धी असल्याचा भास निर्माण करण्याचं अस्त्र सध्या भाजपने उपसल्याच पाहायला मिळतंय.

मुस्लिम हा समाजवादी पक्षाचा मुख्य आधार आहे आणि काँग्रेसचा त्यांना काहीच फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे अँटी MIM तंत्र पुढे करण्यात आलं आहे. त्यामुळे समाजवाडीला त्याचा फटका बसेल आणि एमआयएमचा फायदा झाल्यास त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपाला होईल. दुसरीकडे, ओमप्रकाश राजभर यांच्या नेतृत्वात सुहेलदेव BSP’सारख्या छोट्या पक्षांना वेगळं ठवून बहुजन मतांमध्ये फूट पडायची असं चित्रं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा मुख्य प्रतिस्पर्धी समाजवादी असला तरी भारतीय जनता पक्ष ते थेट समोर आणणार नाही. मात्र समाजवादी पक्षाने अजून पूर्ण पत्ते खुले केले नसल्याने भारतीय जनता पक्षाचं फावतंय, पण परिस्थिती कधी पटलेलं याची शास्वती देता येणार नाही.

तत्पूर्वी बिहारमध्ये चांगलं यश मिळाल्यानंतर MIM इतर राज्यांमध्येही विस्तार करताना दिसत आहे. आता उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीतही एमआयएम मैदानात उतरणार आहे. यासाठी असदुद्दीन ओवेसी यांनी मोर्चबांधणी सुरू केली असून, एका रॅलीमध्ये बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांबद्दल विधानं केलं होतं. ‘योगी आदित्यनाथ यांना पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ देणार नाही,’ असं ओवेसी म्हणाले होते.

बिहार विधानसभेला ओवैसींच्या पार्टीला चांगला यश मिळालं. बंगालमध्ये ते फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. पण यूपीत मुस्लिमांच्या संख्या पहाता, मोठ्या यशाची एमआयएमला अपेक्षा आहे. त्यामुळे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीननं छोट्या पक्षांसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतलाय. तसच असदुद्दीन औवेसींनी 100 जागा लढवणार असल्याची घोषणा केलीय. तसच ओमप्रकाश राजभर यांच्या नेतृत्वात सुहेलदेव भारतीय समाज पार्टीसारख्या छोट्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचं ठरवलंय. ओवैसींनी ट्विट करत म्हटलंय की, उत्तर प्रदेश विधानसभेसाठी आम्ही शंभर जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. तसच पार्टीनं उमेदवार निवडीची प्रक्रियाही सुरु केलीय. एवढच नाही तर उमेदवारी अर्जही जारी केलेत.

दरम्यान, ओवेसींनी दिलेल्या आव्हानाला योगींनी उत्तर दिलं आहे. ओवेसींनी केलेल्या विधानावर बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचं सरकार बनणार. ओवेसी हे देशातील मोठे नेते आहेत. ते देशभर प्रचार करत असतात. त्यांना एका समुदायाचा मोठा पाठिंबा आहे, पण उत्तर प्रदेशात ओवेसी हे भारतीय जनता पक्षाला आव्हान देऊ शकत नाही. भारतीय जनता पक्ष आपले मुद्दे आणि मूल्ये घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरेल. आम्ही त्यांचं आव्हान स्वीकारतो,” असा पलटवार योगी आदित्यनाथ यांनी ओवेसींवर केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 MIM chief MP Asaduddin Owaisi gave challage to CM Yogi Adityanath news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x