6 November 2024 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

उत्तर प्रदेशची जनता भाजपला कंटाळली | याचा परिणाम राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळेल

Uttar Pradesh Assembly Election 2022

लखनौ, २५ जून | आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओमप्रकाश राजभर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, भारतीय जनता पक्षासोबत युती करणार नाही. तसचे एनडीए मध्ये सहभागी होणार नसल्याचे यापूर्वीच म्हटले होते. यानंतर आता ओमप्रकाश राजभर यांनी अजब दावा करत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. जर उत्तर प्रदेशमध्ये आमच्या पक्षाचे सरकार आले, तर ते वेगवेगळ्या जातीच्या नेत्यांना संधी देण्यात येईल. ५ वर्षांत पाच मुख्यमंत्री आणि प्रत्येक वर्षांत चार उपमुख्यमंत्री बनवले जातील, असे म्हटले आहे.

उत्तर प्रदेशची जनता भारतीय जनता पक्षाला कंटाळली आहे. आताच्या घडीला भारतीय जनता पक्षाला कोणी मतदान करणार नाही. याचा परिणाम लवकरच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल, असा दावा करत राजभर यांनी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले.

यावेळी राजभर यांनी निषाद पक्षाच्या संजय निषाद यांच्या मुलावरही जोरदार निशाणा साधला. तुम्ही भारतीय जनता पक्षाकडे भीक का मागत आहात. त्याऐवजी तुम्ही आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू,असे राजभर म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 Om Prakash Rajbhar again criticized BJP party news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x