उत्तर प्रदेश निवडणुक २०२२ | प्रियांका गांधी यांच्यासंबंधित 'तो' जुना सल्ला काँग्रेस आता गांभीर्याने घेणार?
लखनऊ, ०५ ऑगस्ट | प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा खरी ठरणार असल्याची वृत्त आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार पद सोडलं असून या पदाचा अधिकृत राजीनामा दिला आहे.
आगामी ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीसह काँग्रेस २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली असून, पक्षाने आता नवीन व्यूहरचनेकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. यातच आता प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याबद्दल काँग्रेस सकारात्मक असून, याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत किशोर यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचं स्थान हवं आहे. त्यासंदर्भात त्यांनी काही पर्याय काँग्रेसला सूचवले असून, आगामी काळात प्रशांत किशोर सोनिया गांधी यांचे सल्लागारपदीही दिसू शकतात.
दरम्यान, यापूर्वीच्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे करावं असा सल्ला प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला दिला होता. मात्र त्यावेळी काँग्रेसमधील वरिष्ठांनी त्यांना काँग्रेसच्या अंतर्गत प्रक्रियेत ढवळाढवळ करण्याचे सल्ले देऊ नयेत अशी समज दिली होती. पण त्यानंतर उत्तर प्रदेशात काँग्रेसची झालेली दुर्दशा सर्वश्रुत आहे. मात्र आता काँग्रेसला जाग आल्याचं पाहायला मिळतंय.
कारण, काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहेत. लोकांना त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचे आहे, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तर प्रदेशाचे प्रभारी राजेश तिवारी यांनी केला आहे. येथे पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका प्रियांका यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील. सर्व विधानसभा जागांवर पक्ष आपले उमेदवार उभे करेल. जनतेसोबतच काँग्रेस कार्यकर्ते आणि उत्तर प्रदेशचे पदाधिकारीही प्रियांकांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितात, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशचे 100 हून अधिक अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून छत्तीसगडमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. या नेत्यांना बूथ व्यवस्थापनापासून ते काँग्रेसच्या इतिहासापर्यंत माहिती दिली जात आहे. त्यांना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही प्रशिक्षण दिले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 Priyanka Gandhi may face of Chief Minister from congress party news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो