4 January 2025 3:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | कमी पैशांत स्वस्तात मस्त व्यवसाय सुरू करायचा आहे, हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा, दररोज कमाई होईल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरवर ब्रोकरेजकडून 'BUY' कॉल, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: AWL SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, PSU शेअर मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: SJVN IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

युपी सरकारच्या आकडेवारीपेक्षा कोरोना मृतांची संख्या 43 पट जास्त | अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप

Uttar Pradesh Assembly Election 2022

लखनौ, २२ जून | देशात आतापर्यंत 2.99 कोटी नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या संक्रमितांची आकडेवारी पाहिल्यास, आज एकूण संक्रमितांचा आकडा 3 कोटींच्या पुढे जाईल. सध्या भारत जगातील दुसरा सर्वाधिक संक्रमित देश बनला आहे. अमेरिका 3.44 कोटी रुग्णांसह टॉपवर आहे.

देशात आतापर्यंतचे एकूण मृत्यू: 3.89 लाख लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यात उत्तर प्रदेशातील गंगा नदीपात्रातील हजारो कोरोना रुग्णांचे शव पाहून देशचं नव्हे तर जगभरातून उत्तर प्रदेशवर टीका झाली होती. त्यामुळे यूपीतील मृतांची आकडेवारी प्रचंड असूनही ती खरी आकडेवारी जाहीर झाली नसल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र आता याच विषयावरून विरोधकांनी सरकारला लक्ष करताना गंभीर आरोप केले आहेत.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीत फेरफार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी आता केला आहे.

उत्तर प्रदेशात सरकारच्या आकडेवारीपेक्षा कोरोना मृतांची संख्या 43 पट जास्त आहे असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे. तसेच योगी सरकार मृत्यूंचे आकडे नाही तर स्वत:चं तोंड लपवत आहे अशी बोचरी टीका ही अखिलेश यांनी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. “माहितीच्या आधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, असे दिसून आले आहे की, 31 मार्च, 2021 पर्यंत 9 महिन्यांत उत्तर प्रदेशातील 24 जिल्ह्यांमध्ये मृतांची संख्या सरकारच्या आकडेवारीपेक्षा 43 पट जास्त आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं सरकार मृत्यूची आकडेवारी नव्हे तर आपलं तोंड लपवत आहे” असं अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 Samajwadi Party president Akhilesh Yadav made serious allegations on Yogi govt over corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x