4 January 2025 3:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | कमी पैशांत स्वस्तात मस्त व्यवसाय सुरू करायचा आहे, हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा, दररोज कमाई होईल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरवर ब्रोकरेजकडून 'BUY' कॉल, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: AWL SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, PSU शेअर मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: SJVN IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

का आखली जातेय युपीच्या विभाजनाची योजना? | भाजप आणि योगींना निवडणुकीपूर्वी कोणती भीती ? - वाचा सविस्तर

Uttar Pradesh Assembly Election 2022

लखनऊ, १२ जून | पुढच्या वर्षी म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या महत्वाच्या बैठकांना वेग आला आहे. महत्वाचं म्हणजे उत्तर प्रदेश भारतीय जनता पक्षात तत्पूर्वी वादळ आल्याची चर्चा रंगली आहे. सध्याच्या स्थितीला तरी भाजप आगामी उत्तर प्रदेशात पायउतार होणार अशीच राजकीय स्थिती असल्याचं राजकीय विश्लेषक आणि स्थानिक पत्रकार सांगत आहे. परिणामी आरएसएस आणि भाजपमध्ये जोरदार धावपळ सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे त्याहून अधिक घडामोडी विरोधकांच्या गोटात देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे भेदरलेली भाजप सध्या उत्तर प्रदेशाचेच दोन तिकडे करण्याची योजना आखात असल्याचं वृत्त आहे.

मोदी सरकार उत्तर प्रदेशचं विभाजन करुन नवीन पूर्वांचल राज्य तयार करु इच्छितं. पण ह्या विभाजनाला खुद्द योगी आदित्यनाथ यांचाच विरोध असल्याचीही चर्चा आहे. पूर्वांचलची निर्मिती झाली तर योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर मतदारसंघही पूर्वांचलमध्येच जाईल. याचाच अर्थ असा की, पूर्वांचलची निर्मिती म्हणजे योगी आदित्यनाथ यांची लखनौची गादीही बदलली जाणार. याच मुद्यावरुन योगी आदित्यनाथ यांचा गट मोदी-शहांवर नाराज असल्याची चर्चा आहे.

मोठ्या राज्यांचं विभाजन करुन नवे लहान राज्यांची निर्मिती करणं हे भाजपाचं पक्षीय धोरण राहीलेलं आहे. त्यामुळेच पूर्वांचलची निर्मिती करणं हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा असू शकतो. ती झाली तर पूर्वांचल कसं असेल? योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरसह 23 ते 25 जिल्हे पूर्वांचलमध्ये असू शकतात. पूर्वांचलमध्येच विधानसभेच्या जवळपास सव्वाशे जागा येतात. ज्याला पूर्वांचलचा कौल त्याला उत्तर प्रदेशची सत्ता हे आतापर्यंतचं गणित राहीलेलं आहे.

पूर्वांचलचा राजकीय इतिहास पाहिला तर कधीच एका पक्षाला ह्या भागानं सत्ता दिलेली नाही. पूर्वांचलच्याच जवळपास 10 ते 12 जिल्ह्यात भाजपा अजूनही कमजोर स्थितीत आहे. त्यातल्या त्यात आझमगड, जौनपूर, मऊ, बलिया, संत कबीरनगर, चंदौली, आंबेडकरनगर, प्रतापगड, प्रयागराजमध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती म्हणावी एवढी चांगली नाही. ह्या जिल्ह्यांमध्ये समाजवादी पार्टीची चलती आहे. काही ठिकाणी बीएसपीचाही बेस आहे. पूर्वांचलनं येणाऱ्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला साथ दिली नाही तर पूर्ण उत्तर प्रदेशचीच सत्ता गमवावी लागेल अशी भीती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला वाटते. त्यातूनच पूर्वांचलची निर्मिती करण्याचा विचार जोर धरत असल्याचं दिसतं आहे.

 

News Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 Why Modi govt want to form a separate state Purvanchal from Uttar Pradesh news updates.

हॅशटॅग्स

#UttarPradeshAssemblyElection2022(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x