यूपीत कोरोनाने मृत्यूचं तांडव | तर भाजपला २०२२ मधील निवडणुकीची चिंता | योगी मंत्रिमंडळाचा विस्तार | मोदींच्या या विश्वासूला उपमुख्यमंत्री पद
लखनऊ, २७ मे | उत्तर प्रदेशात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी सरकारच्या दुसर्या मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच अमित शहा, नरेंद्र मोदी, जे पी नड्डा आणि आरएसएस’मध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाच्या बैठक पार पडल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर मोदींचे खास माजी आयएएस अधिकारी एके शर्मा यांना उपमुख्यमंत्री पद देऊन उत्तर प्रदेशची धुरा त्यांच्याकडे दिली जाणार असून तेच २०२२ साठी तयारी सुरु करतील असे संकेत मिळाले आहेत.
मध्यप्रदेशचे सर्व कार्यक्रम रद्द करून राज्यपाल आनंदीबेन पटेल अचानक लखनऊला पोहोचल्या. राजभवनातही तयारी सुरू आहे, यामुळे 28 ते 29 मे दरम्यान योगी सरकारच्या दुसर्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी IAS एके शर्मा उपमुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित आहे. यासोबतच केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे उत्तर प्रदेश भाजपाची कमान सोपवून OBC चेहऱ्यासोबत भाजप निवडणुकीत उतरू शकतो.
19 मार्च 2017 रोजी योगी सरकारची स्थापना झाल्यानंतर 22 ऑगस्ट 2019 रोजी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला होता. त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात 56 सदस्य होते. कोरोनामुळे तीन मंत्र्यांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यमंत्री विजय कुमार कश्यप यांचा मृत्यू झाला, तर मंत्री चेतन चौहान आणि मंत्री कमल राणी वरुण यांचा पहिल्या लाटेत मृत्यू झाला आहे. यूपीमध्ये कॅबिनेट मंत्र्यांची जास्तीत जास्त संख्या 60 पर्यंत असू शकते. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 6 स्वतंत्र प्रभारी मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. यात तीन नवीन चेहरे देखील होते.
News English Summary: After canceling all Madhya Pradesh events, Governor Anandiben Patel suddenly reached Lucknow. Preparations are also underway at the Raj Bhavan, which could lead to the expansion of the Yogi government’s second cabinet between May 28 and 29. According to sources, former IAS AK Sharma is all set to become the Deputy Chief Minister. Apart from this, BJP can contest the elections with OBC face by handing over the reins of Uttar Pradesh BJP to Keshav Prasad Maurya.
News English Title: Uttar Pradesh Assembly Election 2022 Yogi govt Cabinet expansion for 2022 assembly election news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC