21 April 2025 5:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

भाजपचा दुपट्टीपणा | यूपीत जुलै-ऑगस्टमध्ये २ पत्रकारांच्या क्रूर हत्या झाल्या होत्या | पण...

Uttar Pradesh, Ballia, Hindi news channel journalist shot dead, Ratan Singh

बलिया, 25 ऑगस्ट : उत्तर प्रदेशमधील गुन्हेगार दिवसेंदिवस निर्भय होत चालले आहेत याची अनेक उदाहरण रोज समोर येतात. आज महाराष्ट्रात अर्णब गोस्वामीला त्याच्या व्यावसायिक कारणातील कुरापतीमुळे म्हणजे अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वास्तविक याचा पत्रकारितेवरील हल्ल्याशी कोणताही संबंध नाही. मात्र भाजपकडून पत्रकारितेवरील हल्ल्याची बोब सुरु असून त्याचा थेट आणीबाणीशी संबंध जोडला जात आहे.

वास्तविक उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात एक अशीच खळबळजनक घटना घडली. ऑगस्ट महिन्यात संध्याकाळी दुचाकींवरून जात असताना एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला गोळ्या घालून ठार केले. रतन सिंह असे त्या पत्रकाराचे नाव होते. सदर घटना लुना पोलीस स्टेशनच्या परिसरात घडली होती. पत्रकाराच्या या खूनामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटनेबाबत पत्रकारांनी देखील प्रचंड संताप व्यक्त केला होता.

त्यावेळी स्वतः बलियाचे पोलीस अधीक्षक देवेंद्रनाथ यांनी सांगितले होते की, ‘वाद झाल्यानंतर काही जणांनी पत्रकार रतन सिंह यांची गोळ्या झाडून हत्या केली. पोलीस पथक या घटनेचा तपास करत आहेत आणि मारेकऱ्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला होता. दुसरीकडे, रतन सिंह यांच्या हत्येनंतर पत्रकारांनी कुटुंबीयांसह धरणे धरले होते. एनएच ३१ वर धरणे धरण्यात आली होती. फेफना पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली होती. या भीषण घटनेचा बलिया वर्किंग जर्नालिस्ट्स युनियनने सिंह यांच्या हत्येबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता.

तत्पूर्वी 20 जुलै रोजी गाझियाबादच्या विजय नगर परिसरात गुन्हेगारांनी पत्रकार विक्रम जोशी यांना आपल्या मुलींसोबत स्कूटीवरून घरी परतत असताना गोळ्या मारून हत्या केली होती. दोन दिवसांनी विक्रम जोशी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दहा आरोपींना अटक केली होती. मात्र उत्तर प्रदेशातील वाढती गुन्हेगारी याबाबत जनतेच्या मनात रोष निर्माण झाला असताना भाजपच्या नेत्यांकडून कोणत्याही तीव्र प्रतिक्रिया किंवा आणीबाणीच्या वल्गना पाहायला मिळाल्या नव्हत्या.

 

News English Summary: A journalist was chased and shot dead by three men in Uttar Pradesh’s Ballia district last night allegedly over a property dispute, said police, adding that all the accused involved in the attack have been arrested.

News English Title: Uttar Pradesh Ballia Hindi news channel journalist shot dead by criminals News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या