21 December 2024 8:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

लसचा पहिला डोस घेतल्याच्या 9 दिवसानंतर योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटिव्ह

CM Yogi Adityanath

लखनऊ, १४ एप्रिल: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर योगींनी स्वतःला विलगीकृत केले होते. त्यांचा कोरोनाचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे, 5 एप्रिल रोजी त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. सोशल मीडियावर त्यांनी कोरोना संक्रमणाची माहिती जारी केली.

योगींनी समाज माध्यमांवर जारी केलेल्या माहितीनुसार, “कोरोना व्हायरसची प्राथमिक लक्षणे दिसून आल्यानंतर चाचणी करून घेतली. चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वतःला आयसोलेट केले असून चिकीत्सकांच्या सल्ल्यांचे पालन करत आहे. सर्वच कार्य आता व्हर्चुली करत आहे.”

देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात कोरोनाची परिस्थिती अतिशय विकट आहे. या ठिकाणी 95 हजारांपेक्षा अधिक सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड, ऑक्सिजनसह व्हेंटिलेटर सुद्धा उपलब्ध होत नाही. इतर राज्यांप्रमाणेच उत्तर प्रदेशात सुद्धा रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे. मुख्यमंत्री योगींनी यापूर्वीच गुजरातमधून 25 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मागवले आहेत.

 

News English Summary: Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath has contracted corona. Yogi had disassociated himself after officers and staff in the CM’s office tested positive for corona. His corona report came positive on Wednesday.

News English Title: Uttar Pradesh CM Yogi Adityanth report corona positive news updates.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x