उत्तर प्रदेशातील हाथरस गँगरेप | पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू
लखनौ, २९ सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras Gang Rape Victim) येते 15 दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या नराधमांनी तिची जीभ कापली, गंभीर अवस्थेत असलेल्या या तरुणीवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आज सकाळी पीडितेचे निधन झाले.
गंभीर जखमी पीडित तरुणीला आधी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. नंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात घेऊन दिल्लीतील एम्सला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 15 दिवसांपूर्वी हाथरसमध्ये सामूहिक बलात्काराची ही घटना घडली होती. मंगळवारी सकाळी सामूहिक बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी आरोपींनी महिलेचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पीडितेने स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोपींनी तरुणीची जीभ कापली होती. गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या तरुणीवर एम्समध्ये उपचार सुरू होते, मात्र या पीडितेला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.
तरुणीच्या मृत्यूपूर्वी तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं की, १४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. याठिकाणी सवर्ण समाजातील चार तरुणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली तेव्हा तिची जीभ छाटलेली होती तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झाली होती.
याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला फक्त जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २३ तारखेला तरुणीच्या जबाबानंतर एफआयआरमध्ये सामुहिक बलात्काराचे कलम जोडण्यात आले. या मुलीच्या कुटुंबियांनी आरोप केला होता की, “त्यांच्या घराजवळ राहणारा २० वर्षीय सवर्ण समाजातील तरुण आणि त्याचे काही नातेवाईक कायम या भागातील दलित समाजातील व्यक्तींना त्रास देत असतात.” पीडित मुलगी ज्या गावामध्ये राहते त्या गावात एकूण ६०० कुटुंबांपैकी केवळ १५ दलित कुटुंब आहेत. पोलिसांनी पीडित मुलीच्या घराजवळील तीन व्यक्तींना सुरुवातीला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील एकजण फरार झाला होता त्यानंतर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
News English Summary: A 19-year-old Dalit woman from Uttar Pradesh succumbed to injuries at a hospital in New Delhi after she was allegedly gangraped by four upper caste men in Hathras district on September 14. The victim was initially admitted to a district hospital 15 days ago with her tongue cut off and spinal cord severely injured, among other serious injuries. She was later shifted to Aligarh hospital for treatment, before moving to Safdarjung Hospital in the national capital.
News English Title: Uttar Pradesh Dalit girl victim of gangrape in Hathras dies during treatment Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News