माँ गंगा ने बुलाय है? गंगा घाटावर हजारो कोरोना मृतदेह पुरले | यूपीतील परिस्थिती भीषण
लखनऊ, १४ मे | देशात करोनाने धुमाकूळ घातला आहे. देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ नवीन रुग्ण आढळले. पण दिलासादायक वृत्त म्हणजे सर्वाधीक रुग्ण बरे होऊण घरी गेले आहेत. ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्णांनी करोनावर मात केली. तर ४००० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. देशात करोनाची लागण होण्याचे प्रमाण दोन कोटींच्या पुढे गेले आहे. तर करोनामुळे मृत्यूंचा आकडा २.६२ लाखांच्या वर पोहोचला आहे.
दरम्यान, सध्या उत्तर प्रदेशातील कानपूर, कन्नौज, उन्नाव, गाझीपूर आणि बलियामधील परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि इथलं भीषण वास्तव देखील समोर आलं आहे. वास्तवात समोर येणारं चित्र हे अत्यंत भीषण असून योगी सरकार हतबल असल्याचं पाहायला मिळतंय.
उत्तर प्रदेशातील बड्या शहरांपैकी एक कानपूरमधील शेरेश्वर घाटाजवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर अनेक मृतदेह पुरण्यात आले आहेत. येथील परिस्थिती खूपच भयावह असल्याचे सांगितले जाते. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त मृतदेहांना जमिनीत पुरलेले दिसत होते. काही मृतदेहांचे कुत्रे लचके तोडत होते तर काहींवर गरुड व कावळे बसलेले दिसले. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांची टीमही येथे पोहोचली. त्यानंतर पोलिसांकडून प्रत्येक मृतदेहावर माती टाकण्याचे काम सुरू झाले.
कोरोना काळातील सर्वात मोठी स्मशानभूमी उन्नावमध्ये असल्याचे दिसून येत आहे. कारण येथीलच शुक्लगंज घाट आणि बक्सर घाटाजवळ 900 हून अधिक मृतदेहांचे दफन करण्यात आले आहे. दरम्यान, तेथे प्रत्येक चरणात मानवी अवयव विखुरलेले दिसतात. सध्या घाई गडबडीत सर्व मृतदेहांना वाळूत पुरुन टाकण्याचं काम सुरु आहे.
UP कानपूर, उन्नाव, गाझीपूर आणि बलियामध्ये सर्वात वाईट परिस्थिती, गंगा घाटावर हजारो कोरोना मृतदेह पुरले pic.twitter.com/pTg51YtxZj
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) May 14, 2021
VIDEO | लोकसभा निवडणूक २०१४ | मुझे तो माँ गंगा ने बुलाया है | आता कोरोना आपत्तीत संपूर्ण वाराणसी त्यांना बोलावत आहे पण ते येतंच नाहीत.#MaaGanga #VaranasiKashi #India #CoronaPandemic #PMModi pic.twitter.com/4YQAZriOgw
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) May 14, 2021
News English Summary: The largest cemetery in the Corona period appears to be in Unnao. More than 900 bodies have been buried near Shuklaganj Ghat and Buxar Ghat here. Meanwhile, there appear to be human organs scattered at every step.
News English Title: Uttar Pradesh Ganga river Ghat coronavirus situation is worst news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो